शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चोरटे ४८ तासांत गजाआड

By admin | Updated: December 21, 2015 23:19 IST

चोरटे ४८ तासांत गजाआड

नाशिकरोड : सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत; दोन लाख जप्तनाशिकरोड : मुक्तिधाम समोरील टिळकपथ येथील दृष्टी सिरॅमिक दुकानाचे शटर उचकटून अडीच लाखांची रोकड चोरून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने ४८ तासांत गजाआड केले. त्यांच्याकडून दोन लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. टिळकपथ साईकृपा कॉम्प्लेक्समधील दृष्टी सिरॅमिक या दुकानांचे बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून गल्ल्यातील २ लाख ५५ हजारांची रोकड चोरून नेली होती. दुकानचालक रज्जाक अल्लाउद्दीन शेख हे बुधवारी सकाळी दुकान उघडण्यास आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता दुकानात चोरी करणारे दोघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये नजरकैद झाले होते. त्या फुटेजच्या आधारे व खबऱ्यांची मदत घेऊन पोलीस उपनिरीक्षक बी. एस. गायकवाड, श्याम कोटमे, प्रकाश भालेराव, अनिल लोंढे, अरुण पाटील, उत्तम पवार यांनी चोरटा भगवान ऊर्फ मन्या रामदास गाढवे (३०, रा. ताजनपुरे मळा, चेहेडी) याला व त्याचा दुसरा साथीदार सुनील शशीराव बिंडे (३०) रा. सुभाषरोड याला पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांकडून दुकानातून चोरलेल्या दोन लाख ५५ हजार रोकडपैकी दोन लाख ३० हजार रुपये हस्तगत करण्यात आले. संशयित मन्या गाढवे याला नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान, नाशिक शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आरोपी कैद होऊनही पोलिसांना सापडले नाहीत. त्यांचा शोध लागावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)