शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

By admin | Updated: April 30, 2017 01:18 IST

मालेगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नाही.

 मालेगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी शनिवारी दिवसभर कार्यालयात तळ ठोकून होते. इच्छुक उमेदवारांनी केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात संपर्क साधून संगणकीय नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती घेतली.महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी २९ एप्रिल ते ६ मेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस कोरडा गेला. दरम्यान, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जगताप यांनी सातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत कार्यालयासंदर्भातील अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात आल्या. काही उमेदवारांनी आॅनलाइन सात अर्ज दाखल केले आहेत. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृतरीत्या सादर केले नसल्यामुळे नामांकन अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारांना बॅँकेत खाते उघडण्यासाठी पॅनकार्डची सक्ती करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्रासोबत केंद्रानिहाय प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीचा अनुक्रमांक टाकणे आवश्यक आहे. तसेच निवडणूक चिन्हाची मागणी करताना तक्त्यामधील चिन्हाची मागणी नोंदवणे गरजेचे आहे. पक्षाचा एबी फार्म शेवटच्या दिवशी ३ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. तसेच छाननीपूर्वी अर्जातील त्रुटी उमेदवाला दूर करता येणार आहे. नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेविषयीच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मनपाच्या मुख्य कार्यालयात हेल्प बेस सेंटर उभारण्यात आले आहे. अर्ज दाखल करताना प्रत्येक उमेदवारासोबत केवळ चारच समर्थकांना प्रवेश दिला जात आहे. प्रभागातील प्रत्येक जागेसाठी उमेदवाराला स्वतंत्ररीत्या अनामत रक्कम भरावी लागणार आहे. येत्या १० व १७ मे रोजी निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली. (वार्ताहर)