चाकूचा धाक दाखवून ट्रकच्या बॅटऱ्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:05 PM2018-08-08T16:05:34+5:302018-08-08T16:06:17+5:30

नाशिक : रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन ट्रकच्या बॅट-या चोरून नेणा-या संशयितास रंगेहाथ पकडण्यात आले. मात्र या भामट्याने चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकांना मारहाण केली व अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून पलायन केल्याची घटना नाशिक-पुणे रोडवरील पळसे येथे घडली़

 Theft of the truck's bat by stabbing knife | चाकूचा धाक दाखवून ट्रकच्या बॅटऱ्यांची चोरी

चाकूचा धाक दाखवून ट्रकच्या बॅटऱ्यांची चोरी

Next
ठळक मुद्दे पुणे रोडवरील प्रकार : अ‍ॅक्टिवावरून पलायन

नाशिक : रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन ट्रकच्या बॅट-या चोरून नेणा-या संशयितास रंगेहाथ पकडण्यात आले. मात्र या भामट्याने चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकांना मारहाण केली व अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून पलायन केल्याची घटना नाशिक-पुणे रोडवरील पळसे येथे घडली़

पळसे कारखाना रोडवरील सोमय्यानगरमधील रहिवासी संदीप कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी आपला स्वत:चा व ओळखीतील ज्ञानेश्वर म्हसदे व केशव एखंडे असे तिघांचेही ट्रक पळसे येथील त्रिमूर्ती प्लाझा येथे पार्क केले होते. मंगळवारी (दि़७) एक संशयित पांढºया अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून आला़ त्याने कोकरे याच्यासह एखंडे व म्हसदे यांच्या तीन ट्रकच्या ५० हजार रुपये किमतीच्या सहा बॅट-या चोरल्या.

दरम्यान, संशयित ट्रकवरील आणखी एका बॅटरीची चोरी करीत असताना त्याला कोकरे, एखंडे व म्हसदे यांनी पाहिले. त्यानंतर या तिघांनी मिळून संशयितास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने केशव एखंडे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले़ तसेच कोकरे व म्हसदे यांना चाकूचा धाक दाखवून पलायन गेले़

या प्रकरणी कोकरे यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Theft of the truck's bat by stabbing knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.