शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

वडांगळी येथील सतीमाता मंदिरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 3:13 PM

वडांगळी : बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील सतीमाता-सामतदादा मंदिरात राॠी बाराच्या सुमारास चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. सुमारे पन्नास हजार रु पयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

ठळक मुद्देसीसीटीव्हीत घटना कैद : चांदीच्या पादुका कापून चोरून नेल्या

वडांगळी : बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील सतीमाता-सामतदादा मंदिरात राॠी बाराच्या सुमारास चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. सुमारे पन्नास हजार रु पयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.शनिवारी (दि.१) रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास दोन चोरट्यांनी मंदिर परिसरात प्रवेश केला. सुरवातीला सतीमाता मंदिराच्या चांदीच्या पादुका काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्या निघत नसल्याने सामतदादा मंदिराकडे जाऊन मंदिराचे कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर तेथील पादुका कापून तोडण्यात आल्या. व चांदीचे कान काढून पोबारा केला.हा सर्व प्रकार सी.सी. टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मंदिराचे सुरक्षारक्षक तानाजी चव्हाणके मंदिर प्रांगणात झोपले होते. दोन चोरट्यांपैकी एक चोरी करत होता तर दुसरा चव्हाणके यांच्यावर लक्ष ठेऊन होता. मंदिराच्या दार व खिडक्यांच्या भोवती कापडी पडदा असल्याने सदरील प्रकार लक्षात आला नसावा असा अंदाज आहे. सुमारे चार तास सदर प्रकार सुरू होता.दोन्ही चोरटे साधारणत: पंचविशीतील वयाचे असावे असा प्राथमिक अंदाज आहे. तोंडाला हात रु माल लावला असल्याने चेहरे ओळखणे मुश्किल आहे. दरम्यान, रविवारी (दि.२) मंदिराचे विश्वस्त अशोक चव्हाण यांनी सिन्नर एम.आय. डी. सी पोलीस ठाण्यात याबाबत तक्र ार दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहे. दरम्यान २०१३ साली अशाच प्रकारे सामतदादा यांच्या पादुका चोरीस गेल्या होत्या. अगदी तोच प्रकार सात वर्षांनी शनिवारी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.(फोटो ०२ सिन्नर, १)सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील सामतदादा मंदिरात चोरट्यांनी चांदीच्या पादुका चोरून नेल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोर