जिल्हा रुग्णालयातून संगणकांची चोरीं

By Admin | Updated: August 4, 2014 02:09 IST2014-08-04T02:02:04+5:302014-08-04T02:09:30+5:30

जिल्हा रुग्णालयातून संगणकांची चोरीं

Theft of computers from the District Hospital | जिल्हा रुग्णालयातून संगणकांची चोरीं

जिल्हा रुग्णालयातून संगणकांची चोरीं

 

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील औषधांची नोंद असणारे औषध भांडारातील दोन संगणक सीपीयूसह चोरीस गेल्याची घटना घडली असून, घटनेच्या तब्बल पाच दिवसांनंतर चोरीची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे़ औषध भांडारातील घोटाळा दडवण्यासाठीच हा संगणक
चोरीचा बनाव करण्यात आल्याची चर्चा रुग्णालयीन कर्मचाऱ्यांमध्ये आहे़
जिल्हा रुग्णालयाच्या औषध भांडारमध्ये कामास असलेले चंद्रकांत के दू शिरोडे (५९, इच्छामणी, दुर्गानगर, कामटवाडे, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार २६ ते २८ जुलै या कालावधीत औषध भांडारचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी टेबलवर ठेवलेले पन्नास हजार रुपये किमतीचे लिनिओ कंपनीचे दोन संगणक हे सीपीयू, मॉनिटरसह चोरून नेले़
या प्रकरणी शिरोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Theft of computers from the District Hospital