थरारक : नागपंचमीच्या पूर्वसंध्येला जखमी नागराजाला सर्पमित्राने दिले जीवदान

By Admin | Updated: August 1, 2014 01:09 IST2014-07-31T22:51:36+5:302014-08-01T01:09:48+5:30

सिन्नर-डुबेरे रस्त्यावर कुत्रा-कोब्राची झुंज!

Tharakak: Givedan gave Sarpamitra to the injured Nagaraja on the eve of Nagpanchami | थरारक : नागपंचमीच्या पूर्वसंध्येला जखमी नागराजाला सर्पमित्राने दिले जीवदान

थरारक : नागपंचमीच्या पूर्वसंध्येला जखमी नागराजाला सर्पमित्राने दिले जीवदान

शैलेश कर्पे ल्ल सिन्नर
शेतात काम करणाऱ्या मालकाजवळ कोब्रा दिसताच पाळीव कुत्र्याने त्याच्यावर जोरदार हल्ला चढविल्याची घटना सिन्नर-डुबेरे रस्त्यावर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. शेळके मळ्यातील ‘वाघ्या’ नावाचा पाळीव कुत्रा व कोब्रा नाग यांच्यात सुमारे पाच मिनिटे झालेला चाललेला लढतीचा थरार शेतकऱ्यासह मजूरांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. आक्रमक कुत्र्याच्या पुढे नागराजाला आपला जीव वाचविण्यासाठी नमते घेत झाडावर चढण्याची वेळ आली.
त्याचे झाले असे.. सिन्नर-डुबेरे रस्त्यावर किशोर बाजीराव शेळके यांची वस्ती आहे. किशोर शेळके यांचे लहान बंधू दीपक शेळके त्यांचे कुटुंबिय व मजूर कांद्याच्या गोण्या भरण्याचे काम करीत होते. कांद्याच्या गोण्या भरत असतांना सुमारे सहा फूट लांबीचा तपकीरी रंगाचा कोब्रा सळसळ करीत बाहेर आला. नागराजाला पाहताच शेळके यांच्यासह उपस्थित अवाक् झाले. याचवेळी शेळके यांच्याजवळच उभ्या असलेल्या वाघ्या नावाच्या पाळीव कुत्र्याने नागावर हल्ला चढवला. आपल्या धारधार नखाने त्याच्यावर वार करीत वाघ्या अधिक आक्रमक झाला. त्याला प्रत्युतर देण्यासाठी नागानेही फणा उभारला. कुत्रा व नागातील द्वंद पाहून उपस्थितीत स्तब्ध झाले. सुमारे पाच मिनिटे कुत्रा व कोब्रा यांच्यात झुंज सुरु होती. कुत्र्याच्या आक्रमणापुढे नागराजाने बचावात्मक पवित्रा घेतला व घटनास्थळाहून निघून जाणे पसंत केले. मात्र वाघ्याने त्याचा पिच्चा सोडला नाही. अखेर नाग जवळील करंजीच्या झाडावर चढू लागल्यानंतर कुत्र्याने त्याच्या शेपटीच्या पुढे सुमारे फूटभर लचका तोडला व त्याला पुन्हा खाली ओढले. यावेळी उपस्थितीतांनी कुत्र्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याचे थोडसे दुर्लक्ष होताच कोब्रा करंजीच्या झाडावर चढला. त्यानंतरही कुत्र्याचे नागाच्या दिशेने उड्या मारणे व भुंकणे सुरुच होते.
दीपक शेळके यांनी तातडीने सिन्नरचे सर्पमित्र विजय वराडे यांच्यासोबत मोबाईलवर संपर्क साधला. वराडे यांच्यासह रवी पवार व योगेश छल्लारे यांनी तातडीने शेळके यांच्या वस्तीवर धाव घेतली. करंजीच्या झाडावर असलेल्या चढलेल्या नागराजाला वराडे यांनी अलगद पकडले. त्यानंतर वराडे यांनी कोब्राला येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एम. जी. सिसोदिया यांनी जखमी कोब्रावर उपचार केले. कुत्र्याचे दात लागल्याने कोब्रा नाग जखमी होण्यासह त्याचा मणका तुटला.

Web Title: Tharakak: Givedan gave Sarpamitra to the injured Nagaraja on the eve of Nagpanchami