शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणगावला दिवसाढवळ्या वृक्षतोड ;  कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:16 IST

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसरात दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल होत असून, वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसरात दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल होत असून, वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. वनविभागाचे सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर क्षेत्र या भागात आहे. परिसरात वन्यप्राण्यांची संख्यादेखील जास्त आहे. वनविभागाने या परिसरातील मारुतीचा मोडा भागात नवीन वृक्षांची लागवड केलेली आहे. या भागात वृक्षांचे प्रमाण अधिक असल्याने व उन्हाळ्याची चाहूल लागल्याने महिलांच्या हाताला काही काम नसल्याने महिलांचा मोर्चा आता जंगलातील झाडांकडे वळालेला दिसत आहे. महिला सकाळी किंवा रात्रीच्या वेळी लाकडे गोळा करून सरपणाची मोळी घेऊन येताना दिसतात.  वनविभागाच्या वतीने कर्मचारी दिवसभर तळ ठोकून असतात. पण जोपर्यंत वन कर्मचारी तळ ठोकून असतात तोपर्यंत महिला जंगलात जात नाहीत. मारुतीचा मोडा, उंबरदरी धरण परिसर, लावदरी, भिकरवाडी परिसर आदी भागात जंगलातील वृक्षांचे प्रमाण जास्तच असल्याने महिलावर्ग लाकडे तोडण्यासाठी या भागात जात असतात. महिला झाडाची कत्तल करून एक दोन दिवस लाकडे सुकण्यासाठी ठेवतात व त्यानंतर घेऊन जातात. सकाळी दिवस उजाडण्याच्या अगोदर सरपणाची मोळी घेऊन येतात. वनविभागाने दिवसा व रात्री गस्त घालावी व जंगलतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.  वनविभागाच्या वतीने वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. मारुती मोढा परिसरात मोरांचे प्रमाण अधिक असून, या भागात लोकवस्तीही जास्त आहे.मानवी वस्तीकडे मोरांचे जाणे-येणे अधिक असल्याने पाणवठे उभी केली तर वस्तीवर राहणारा लोकांना सुध्दा त्या पाणवडयात पाणी टाकता येऊ शकेल. परिसरात अन्य हिंस्त्र प्राण्यांचे प्रमाण जास्त असूनदेखील महिला सरपण गोळा करण्यासाठी जाताना दिसतात. कडक उन्हाळा लागलेला असून, वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे वळत आहेत. पावसाळ्याच्या सरपणासाठी महिला सरसकट जिवंत वृक्षांवर कुºहाड चालवत आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग