ठाकरे यांच्या हस्ते शाळेचे लोकार्पण

By Admin | Updated: December 28, 2016 01:27 IST2016-12-28T01:27:37+5:302016-12-28T01:27:51+5:30

ठाकरे यांच्या हस्ते शाळेचे लोकार्पण

Thackeray's inauguration of school | ठाकरे यांच्या हस्ते शाळेचे लोकार्पण

ठाकरे यांच्या हस्ते शाळेचे लोकार्पण

सिडको : कामटवाडेमधील मासाहेब मीनाताई ठाकरे विद्यामंदिर शाळेसह प्रभाग क्रमांक ४८ मधील मनपाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अशोक मुर्तडक उपस्थित होते.
सिडको प्रभाग क्रमांक ४८ मधील मनपाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण तसेच कामटवाडे येथील मासाहेब मीनाताई ठाकरे विद्यामंदिर शाळा क्रमांक १०२, लोकनेते काळूशेठ धोंडीराम मटाले माध्यमिक विद्यालय तसेच पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर विद्यालय शाळा क्रमांक ३१ आदिंचे लोकार्पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाकरे म्हणाले मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नगरसेवकांकडून प्रयत्न केले जात आहे. नाशिकबरोबरच मुंबई - ठाणे भागात नगरसेवकांकडून विकासकामे केली जात आहे.
यावेळी व्यासपीठावर मनसे नेते अविनाश अभ्यंकर, प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख आदि उपस्थित होते. स्वागत नगरसेवक कांचन पाटील यांनी, तर सूत्रसंचालन बाळासाहेब मटाले यांनी केले. यावेळी मनसे चिटणीस अ‍ॅड. अतुल सानप, नामदेव पाटील, सिडको विभाग अध्यक्ष रामदास दातीर, सागर कडभाणे, नितीन माळी, सुनील मटाले, भास्कर जाधव, सुरेंद्र धाकराव आदि उपस्थित होते. आभार अनिल मटाले, कांचन पाटील यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Thackeray's inauguration of school