शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नागरेसह दहा संशयितांच्या कोठडीत वाढ

By admin | Updated: December 29, 2016 23:31 IST

नवीन वर्ष कोठडीत : फरार साथीदाराचा शोध सुरू

नाशिक : बनावट नोटा छापल्याप्रकणी अटकेत असलेला राष्ट्रवादी कॉँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरेसह दहा संशयित आरोपींना येत्या २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले.
पुणे आयकर विभाग युनिट एक व आडगाव पोलिसांनी गुरुवारी (दि़ २२) मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचून ११ संशयितांकडून १़३५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांमध्ये छबू नागरे, महापालिकेचा माजी घंटागाडी ठेकेदार रामराव पाटील व सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर यांच्यासह आदि संशयितांना न्यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या सात दिवसांची पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी (दि.२९) संपल्यानंतर या सर्व संशयितांना पोलिसांनी जिल्ह्यत न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड. सुनीता चिताळकर यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडत गुन्'ाच्या पुढील तपासासाठी तसेच गुन्'ाची व्याप्ती मोठी असल्यामुळे सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी संशयित आरोपींची संख्या जास्त असल्यामुळे तपासात अडचणी निर्माण होत असून, संशयितांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच काही संशयितांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, मोठी टोळी या गुन्'ामागे असू शकते असे न्यायालयापुढे सांगितले. नागरेचा साथीदार कृष्णा अग्रवालचा पोलीस शोध सुरू आहे. न्यायाधीश डिंपल देढीया यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकत अकरा संशयितांच्या पोलीस कोठडीत येत्या २ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. यामुळे या सर्व संशयितांचे नवीन वर्षाला क ोठडीत सुरुवात होणार आहे....या संशयिताना पोलीस कोठडीबनावट नोटा छपाई प्रकरणी न्यायालयाने संशयित छबू दगडू नागरे, रामराव तुकाराम पाटील, रमेश गणपत पांगारकर, संदीप संपतराव सस्ते, ईश्वर मोहन परमार, राकेश सरोज परमार, नीलेश सतीश लायसे, प्रभाकर केवल घरटे, संतोष भीमा गायकवाड, गौतम चंद्रकांत जाधव, प्रवीण संजयराव मांढरे या अकरा संशयिताना सोमवारपर्यंत (दि़ २ जानेवारी) पोलीस कोठडी सुनावली आहे़नातेवाइकांचा गोतावळा
बनावट नोटा छापल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अकरा संशयित आरोपींना दुपारी न्यायालयात आणण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या आवारात या सर्व संशयितांच्या नातेवाइकांचा गोतावळा पहावयास मिळाला. दरम्यान, काही नातेवाइकांच्या डोळ्यांमध्ये यावेळी अश्रूही तरळले. वाढीव पोलीस बंदोबस्तामध्ये सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले.