शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

सत्पाळकर यांना तात्पुरता जामीन

By admin | Updated: March 2, 2016 23:32 IST

अनामत जमा करण्याचे आदेश : राज्याबाहेर जाण्यास बंदी

 नाशिक : मैत्रेयच्या संचालक वर्षा सत्पाळकर यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. २) वीस दिवसांसाठी तात्पुरता सशर्त अंतरीम जामीन मंजूर केला. चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सत्पाळकरांचे पारपत्र जप्त करण्याचे आदेश देत महाराष्ट्राबाहेर जाण्यास बंदी घातली आहे.सत्पाळकर यांना फेब्रुवारी महिन्यात गुरुवारी (दि. १८) जिल्हा व सत्र न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सदर कोठडीची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी बुधवारी न्यायालयापुढे हजर के ले. सत्पाळकरांनी वकिलांमार्फत जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एम.एच. मोरे यांच्या न्यायालयात केला होता. या अर्जावर न्यायालयात सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र घुमरे, अ‍ॅड.पंकज चंद्रकोर व सत्पाळकरांच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला. सत्पाळकर यांनी राज्य सोडून जाऊ नये, तसेच त्यांचे पारपत्र पोलिसांनी जप्त करावे आणि एक कोटी ४७ लाख रुपयांची अनामत रक्कम दोन टप्प्यांत जमा करावी, असे आदेश देत न्यायालयाने जामीन मंजूर केला.मैत्रेय गु्रपमधील गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंपनीमार्फत देण्यात आलेले धनादेश बँकेत न वटता परत आल्याने काही तक्रारदारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर (रा़ पालघर) यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, सत्पाळकरांचा भाऊ व कंपनीचा दुसरा संचालक परुळेकर अद्याप पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही.