शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तलाठी, बॅंकांना बजावणार नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST

मालेगाव : संजय गांधी योजनेसह सर्व अर्थसाहाय्य योजनेतील लाभार्थींशी प्रशासनासह संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यांनी संवेदनशील ...

मालेगाव : संजय गांधी योजनेसह सर्व अर्थसाहाय्य योजनेतील लाभार्थींशी प्रशासनासह संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यांनी संवेदनशील राहून समन्वय साधत न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. दरम्यान, बैठकीत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी संजय गांधी योजनेत विलंब करणाऱ्या तलाठी, बँकांना नोटिसा बजावणार असल्याचे सांगितले.

शासकीय विश्रामगृहातील सभागृहात राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेच्या लाभार्थींना अर्थसाहाय्याचे धनादेश भुसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी आढावा बैठकीत भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, तहसीलदार किशोर मराठे, नायब तहसीलदार (संगायो) विकास पवार, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे यांच्यासह संजय गांधी योजनेचे नवनियुक्त सदस्य उपस्थित होते. आढावा बैठकीला ज्या बँकेचे प्रतिनिधी अनुपस्थित होते, त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत मंत्री भुसे म्हणाले, स्थानिक राष्ट्रीयीकृत बँकांनी आपल्या शाखेत लाभार्थींचे खाते उघडण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. संगायोसारख्या अर्थसाहाय्य योजनेतील लाभार्थींसाठी आपल्या बँकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी. योजनेतील महिला लाभार्थींना सन्मानाची वागणूक देण्यात यावी. या योजनेतील प्रत्येक लाभार्थी हा वयोवृद्ध असल्यामुळे त्यांच्या विषयी संवेदनशील राहून त्यांची कामे प्राधान्याने करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गत दोन वर्षांमध्ये मंजूर झालेल्या प्रकरणातील बरेच लाभार्थी हे मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहेत त्याची चौकशी करून आवश्यक त्रुटींची पूर्तता करून लाभार्थींना न्याय देण्यासाठी मोहीम स्वरूपात कामकाज करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, सदस्य भगवान मालपुरे, महेंद्र साळुंखे, सुनील पगार, गोरख शेवाळे, नाना निकम, दीपक तलवारे, अण्णा पवार आदी उपस्थित होते.

----

प्रत्येक गाव, गटनिहाय माहिती

अर्थसाहाय्य योजनेतील लाभार्थींच्या कामासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी बँकांसह तलाठ्यांनी प्राधान्यक्रम ठरविण्याचे आवाहन करताना अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम म्हणाले, संजय गांधी योजनेतील लाभार्थींना दरमहा मिळणारे अर्थसाहाय्य विलंबाने प्राप्त होण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी प्रत्येक गाव व गटनिहाय माहिती संकलित करून होणारा विलंब ज्या तलाठ्यांमुळे व ज्या बँकेमुळे होत असेल त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ नोटीस बजावण्यात यावी, अशा सूचनाही अपर जिल्हाधिकारी निकम यांनी यावेळी दिल्या.

-----------

मालेगावी संजय गांधी निराधार योजनेचा आढावा घेताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम आदी. (२७ मालेगाव भुसे)

270821\27nsk_47_27082021_13.jpg

२७ मालेगाव भुसे