शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुकावासीयांचा पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: April 2, 2016 00:02 IST

विहिरींनी गाठला तळ : घोटभर पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती

पाटोदा : येवला तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे पाणी मिळेल का नाही, हा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. संपूर्ण तालुक्यातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. तालुक्यातील नद्या, नाले व ओढे गेली तीन वर्षांमध्ये एकदाही भरले नाहीत. या गंभीर परिस्थितीमुळे तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांना भटकंती करावी लागत आहे व आपली तहान भागवण्यासाठी मिळेल तेथून पाणी आणावे लागत असल्याने लहान मुलांसह वृद्धांनाही पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. एवढी भीषण परिस्थिती असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे व कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. सध्या ग्रामीण भागात सण, उत्सव, लग्नसराई कार्यक्रमाकरिता घरी आल्यानंतर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यात भर म्हणून भारनियमनाच्या वेळेत वाढ झाल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.तालुक्यातील पाण्याची पातळी प्रचंड खोलवर गेली आहे. सर्व पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडले आहेत. असे असतानाही शेतकऱ्यांनी बोअरवेल घेऊन जमिनीची चाळण केली आहे; मात्र पाणी लागत नाही. ९०० / १००० फुटापर्यंत बोअर घेऊनही पाणी लागत नसल्याने नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, अशी अवस्था झाली आहे.तालुक्यात गतवर्षी व यंदाही कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ज्यांच्याकडे थोड्या फार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, अशा लोकांनी पाण्याचा व्यवसाय चालू केला असून, नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे. पण याबाबत बोलतंय कोण? जो कोणी बोलतो त्याला पाणीच बंद असा फतवाच काढला आहे. तांब्याभर पाणी व पोटभर जेवण दिल्यास पुण्याचे सार्थक होते. पण सध्याची परिस्थिती पाहता ती मोडीत निघाली आहे. विकत पाणी मिळेना मग फुकट कोण देणार. (वार्ताहर)