‘स्वर-अंजोर’ मैफलीला दाद

By Admin | Updated: September 17, 2014 00:11 IST2014-09-16T00:32:57+5:302014-09-17T00:11:47+5:30

‘स्वर-अंजोर’ मैफलीला दाद

'Swan-Anjor' concert mallila | ‘स्वर-अंजोर’ मैफलीला दाद

‘स्वर-अंजोर’ मैफलीला दाद

 

नाशिक : हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्गज संगीतकारांनी लोकप्रिय केलेल्या गीतांच्या संगीत कार्यक्रमास उपस्थितांनी दाद दिली.
साहित्यिक तथा संगीत समीक्षक स्व. वसंतराव पोतदार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राजा पाटेकर यांनी हार्मनी आर्ट गॅलरी येथे ‘स्वर-अंजोर’ हा निवडक हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर केला. ‘वोतो चले गये’ या उषा पाटेकर यांच्या गीताने मैफलीची सुरुवात झाली. या कार्यक्रमात सज्जाद, जयदेव, मदनमोहन, रोशन, शंकर-जयकिशन, सी. रामचंद्र, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आर. डी. बर्मन, नौशाद, हेमंतकुमार, पंडित रविशंकर, हुस्नलाल भगतराम यांची गीते नाशिकच्या कलाकारांनी सादर केली. त्यामध्ये उषा पाटेकर, मुग्धा कुलकर्णी, निलांबरी औरंगाबादकर, योगेश जाधव, डॉ. संगीता शहा, जयंत पाटेकर आदिंनी गीते सादर केली. या गायकांना किशोर पाटेकर (सिंथेसायझर), राजन अग्रवाल (तबला), अजय गायकवाड (आॅक्टोपॅड) जयंत पाटेकर (गिटार) यांनी साथ केली. जयंत पाटेकर यांनी सूत्रसंचलन केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Swan-Anjor' concert mallila