शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभीमानी शेतकरी संघटनेची नाशिक जिल्हा बॅँकेला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 15:13 IST

जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्षांनी कर्जवसुली मोहिम हाती घेवून त्यासाठी तालुका निहाय बैठकांचे आयोजन केले असून, बॅँकेच्या अधिकारी, कर्मचा-यांकडून शेतक-यांच्या घरी जावून पैशांसाठी दमदाटी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

ठळक मुद्देसक्तीची कर्जवसुली थांबवा : कुलूप लावण्याचा प्रयत्न बॅँकेच्या मुख्य पाय-यांवर बसून जोरदार घोषणाबाजी

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मार्च अखेर कर्जदार शेतकऱ्यांकडील वसुलीसाठी त्यांचे वाहने व मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचा आरोप करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी जिल्हा बॅँकेच्या मुख्य कार्यालयाला धडक देत कुलूप लावण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने बॅँकेसमोर निदर्शने करण्यात आली.या संदर्भात संघटनेच्या पदाधिका-यांनी बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांची भेट घेवून त्यांना निवेदनही सादर केले. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्षांनी कर्जवसुली मोहिम हाती घेवून त्यासाठी तालुका निहाय बैठकांचे आयोजन केले असून, बॅँकेच्या अधिकारी, कर्मचा-यांकडून शेतक-यांच्या घरी जावून पैशांसाठी दमदाटी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कर्जवसुलीच्या नावे शेतक-यांना चौकात बेअब्रु केले जात असून, ते त्वरीत थांवावे अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी दिलेल्या निवेदनात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे की, शेतक-यांची सक्तीची सुलतानी पद्धतीची कर्ज वसुली थांबवावी, शेतक-यांच्या ट्रॅक्टरचे लिलाव थांबवून ट्रॅक्टर परत शेतकºयांना देण्यात यावे, सन २००३ ते २०१४ या कालावधीत शेतक-यांना कर्ज वाटप करताना त्याची मंजुरी १३ ते १४ लाख रूपयांची असून, शेतक-यांनी ट्रॉलीसाठी कर्ज घेतलेले नसताना त्यांच्या नावावर जास्तीचे कर्ज कसे दाखविण्यात आले याची माहिती द्यावी, बॅँकेच्या स ंचालकांची कर्जाची माहिती प्रसारित करून त्याबाबत श्वेतपत्रिका काढावी, कर्जमुक्तीचा शासन निर्णय असताना शेतक-यांना व्याज व दंड, सरचार्जेस या दंडात्मक कारवाया थांबवाव्यात आदी मागण्याही करण्यात आल्या. यावेळी पदाधिका-यांनी बॅँकेच्या मुख्य पाय-यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, दिपक पगार, संदीप जगताप, हंसराज वडघुले, सोमनाथ बोराडे, नाना ताकाटे, सुभाष अहिरे, निवृत्ती गारे, साहेबराव मोरे, निवृत्ती खालकर, श्रावण देवरे, भाऊसाहेब तासकर आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :bankबँकNashikनाशिक