शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

साधनेतून मिळते चिरकाल प्रतिभा

By admin | Updated: September 26, 2016 02:06 IST

प्रकाश पाठक : प्रतिभा संगम संमेलनाचा समारोप

नाशिक : कलाक्षेत्रासह अन्य क्षेत्रांतही अतिशिघ्रतेने प्राप्त होणारी प्रतिभा अहंकार नावाच्या विषयाला जोडली जाण्याची भीती असते. त्यामुळे कलेच्या प्रांतात उंची गाठण्यासाठी अभ्यास, वाचन, व्यासंग, साधनेची व एकाग्रतेची गरज असून, या मार्गाने प्राप्त केलेली प्रतिभा चिरकाल टिकते, असे प्र्रतिपादन प्रा. प्रकाश पाठक यांनी केले.रावसाहेब सभागृहात उभारण्यात आलेल्या महाकवी वामनदादा कर्डकनगरीत महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रतिभासंगम संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. निसर्गकवी नीलेश पाटील व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्यासह अभाविपचे शहराध्यक्ष डॉ. प्रशांत टोपे, प्रदेशमंत्री राम सातपुते, प्रमोद कऱ्हाड, अमोल अहिरे आदि उपस्थित होते. पाठक म्हणाले, प्रसंगावधनता आणि त्या प्रसंगाच्या गांभीर्यातून उत्स्फूर्तपणे सुचणारे काव्य, कथा आदि विविध साहित्यप्रकार हे चिरकाळ टिकतात. कुसुमाग्रजांनी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’सारख्या गहन कविता लिहिल्या. त्या आजही चिरतरुण वाटतात. कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे ओजस्वी क्र ांतिकवी उभा राहतो आणि ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ असा गगनभेदी जयघोष कानी ऐकू येतो. त्यांनी १९६२च्या युद्धकाळात रचलेले हे गीत उत्स्फू र्त साहित्यरचनेचे उदाहरण असल्याचे मत पाठक यांनी व्यक्त केले. तसेच काश्मीर येथील उरी खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही प्रतिक्रिया उमटण्यासाठी उत्स्फूर्त रचना गरजेची असल्याचे ते म्हणाले. वर्णन आणि अनुभव हे दोन वेगळे विषय असून, अनुभवातून रचनेत आत्मियता येते, तर वर्णनात शब्दांची झालर आल्याने त्यात आत्मियता नसल्याचे स्पष्ट जाणवते. अनुभवातून प्राप्त शक्तीच्या आधारे असामाजिकतेवर प्रहार करण्याचे बळ प्राप्त होत असल्याचे पाठक यांनी सांगितले. प्रास्ताविक राम सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत टोपे यांनी केले. अमोल अहिर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)