दुचाकी चोरी प्रकरणी संशयिताना कोठडी

By Admin | Updated: July 29, 2014 00:51 IST2014-07-28T23:56:02+5:302014-07-29T00:51:44+5:30

दुचाकी चोरी प्रकरणी संशयिताना कोठडी

Suspicious robbery in case of two-wheeler theft | दुचाकी चोरी प्रकरणी संशयिताना कोठडी

दुचाकी चोरी प्रकरणी संशयिताना कोठडी

नाशिक : दिवसा व रात्रीच्या सुमारास बनावट चावीच्या साहाय्याने हॅँडल लॉक तोडून वाहने चोरी करणाऱ्या दोघा संशयिताना पंचवटी पोलिसांनी अटक केली असून, या संशयिताना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दोन दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कोपरगाव येथील अमोल लक्ष्मण पारे व शिर्डीतील गणेश नंदकिशोर अहेर या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी पंचवटी परिसरातून तब्बल १४ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली
होती.
गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, नीलेश पवार यांनी कोपरगाव, शिर्डी भागात जाऊन संशयितांनी चोरी केलेल्या दुचाकी जप्त केल्या होत्या. या संशयितांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या दुचाकी चोरी केल्या असून, यात १४ दुचाकी जप्त केल्या होत्या. पारे व अहेर यांचा साथीदार व फुलेनगर येथे राहणारा विकी वाघ हा मुख्य सूत्रधार असून, सध्या फरार झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suspicious robbery in case of two-wheeler theft