शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

छेडखानी प्रकरणी संशयितास अटक

By admin | Updated: March 30, 2015 00:38 IST

सीबीएसजवळील घटना : संशयित पोलीस कर्मचारी फरार

नाशिक : नृत्याच्या शिकवणीहून घरी परतणाऱ्या मुलीची छेड काढणारा प्रमुख संशयित वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी अनिल जाधव फरार झाला असून, त्याचा साथीदार मनोज चंदनशीव (२०, रा. फुलेनगर, पंचवटी) यास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे़ त्यास न्यायालयात हजर केले असता १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ शनिवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास शिवाजी रोडवर ही घटना घडली होती़कमोदनगर परिसरात राहणारी ही मुलगी शनिवारी सायंकाळी नृत्याच्या शिकवणीहून कमोदनगरला जाण्यासाठी शिवाजीरोडने सीबीएसकडे जात होती़ तिथे पोलीस कर्मचारी अनिल जाधव याने तिला अडवून छेड काढल्यानंतर तिने त्याच्या मुस्कटात दिली़ यामुळे दुखावलेल्या जाधवने तुझ्यावर गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली़ तेव्हा तेथील एका रिक्षाचालकाने तिच्यावर नाही तर तुमच्यावरच गुन्हा दाखल होईल, असे सांगितल्यांनतर जाधव तेथून निघून गेला़ सदर मुलगी रिक्षात बसून कमोदनगरला जात असताना पल्सर दुचाकीवर अनिल जाधव आणि मनोज चंदनशीव यांनी तिचा पाठलाग करून अडविले व मारण्याचा जाब विचारला तसेच तिच्या अंगावर ७०३८५९९३६२ हा मोबाइल नंबर लिहिलेला एक कागद फेकला़ या प्रकारामुळे घाबरलेली मुलगी घरी पोहोचली व तिने पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून विनयभंगाची फिर्याद दिली़ दरम्यान, हा गुन्हा भद्रकाली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला़ भद्रकाली पोलिसांनी या मोबाइल नंबरवरून राज्य परिवहन महामंडळातील शहापूर बस डेपोमध्ये नोकरीस असलेल्या मनोज चंदनशीव (वय २०, फुलेनगर, पंचवटी) यास अटक केली असून, प्रमुख संशयित पोलीस कर्मचारी अनिल जाधव फरार आहे़ (प्रतिनिधी)