ओझर नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 18:44 IST2019-06-18T18:44:05+5:302019-06-18T18:44:55+5:30
ओझर : शहर व परिसराची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या ओझर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक सुरेश पवार तर उपाध्यक्षपदी दत्तू पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ओझर नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश पवार
विद्यमान अध्यक्ष हेमंत देवधर व उपाध्यक्ष दिलीप पगार यांनी आवर्तन पद्धतीनुसार पदाचे राजीनामे दिल्यानंतर नवीन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक निवडणुक निर्णय अधिकारी योगेश कापसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. अध्यक्षपदासाठी सुरेश पवार यांच्या नावाची सुचना देवधर यांनी केली तर उपाध्यक्षपदासाठी दत्तू पवार यांच्या नावाची सुचना पगार यांनी केली. मुदतीत इतर कोणाचेही अर्ज दाखल न झाल्याने निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी पदाधिका-यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
संचालक मंडळाच्या बैठकीस सचिव भारत पल्हाळ, ज्येष्ठ संचालक राधाकृष्ण जाधव, दिनकर चौरे ,जंगल शिंदे, श्रीकिशन धामट, रत्नाकर शिंदे ,यशवंतराव गवळी, रमाकांत गणोरे , प्रशांत अक्कर, सुनंदा थोरात, ज्योती भट्टड, व्यवस्थापक पुंडलिक गवळी यांच्यासह ओझर मर्चट बँकेचे अध्यक्ष नवनाथ मंडलिक, संचालक अरूण पवार, रवींद्र भट्टड, विकास भट्टड, पुष्कर जाधव, दिलीप पवार, सुनील दुसाने, पंकज थोरात, परेश पवार, कल्पेश पवार आदि उपस्थित होते.