शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन फिल्डमुळे सुरत-नाशिक अंतर दोन तासांत ! वेगवान : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार सुरत-हैदराबाद महामार्ग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 00:57 IST

नाशिक : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार होणाऱ्या सुरत-हैदराबाद व्हाया नाशिक या महामार्गामुळे नाशिक ते सुरत अंतर केवळ २ तासात कापणे शक्य होणार आहे.

नाशिक : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार होणाऱ्या सुरत-हैदराबाद व्हाया नाशिक या महामार्गामुळे नाशिक ते सुरत अंतर केवळ २ तासात कापणे शक्य होणार आहे. या महामार्गामुळे भविष्यात नाशिक - सुरत अंतर केवळ १७६ किलोमीटरवर येणार असल्याने दोन्ही शहरांची कनेक्टिव्हिटी प्रचंड वेगवान होऊ शकणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६ तालुके आणि ६९ गावांमधून जाणाऱ्या या प्रस्तावित महामार्गामुळे या सहाही तालुक्यांच्या विकासाच्या प्रक्रियेला वेग येऊ शकणार असल्याचे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंंडियाचे (न्हाई) प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे यांनी सांगितले.नाशिक सिटिझन फोरमतर्फे उंटवाडी येथील द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स नाशिक शाखेच्या हॉलमध्ये ह्यसुरत-हैदराबादह्ण या महामार्गाबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (न्हाई) प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, प्रकल्प सल्लागार राजू, व्यवस्थापक दिलीप पाटील तसेच ज्येष्ठ उद्योजक हेमंत राठी आणि आशिष कटारिया मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रस्ताविक प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हा प्रस्तावित महामार्ग सहापदरी असणार आहे. या महामार्गामुळे जिल्ह्यातील दोनशे हेक्टर क्षेत्रातून हा महामार्ग ह्यग्रीन फिल्ड महामार्गह्ण संकल्पनेनुसार तयार होणार असल्याने पर्यावरणाची फारशी हानी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील ६९ गावांमधून हा महामार्ग जाणार असून, फुड क्लब, लॉजेस्टिकसह इतर सुविधांमुळे रोजगारवृद्धीसही मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प नाशिकच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचेही साळुंखे यांनी नमूद केले.सध्या सुरत ते चेन्नईसाठी देशात तीन महामार्ग आहेत. ते महामार्ग सुमारे १६०४, १६१४ आणि १५६७ किलोमीटर या महामार्गांची लांबी आहे. मात्र, सुरत ते हैदराबाद या महामार्गामुळे सुरत-चेन्नई हे अंतर सुमारे १२५० किलोमीटरपर्यंत येणार आहे. या संपूर्ण अंतरासाठी त्यासाठी दहा तासांचा अवधी लागेल, तर नाशिकहून चेन्नईपर्यंत आठ तासांत पोहोचणे शक्य होईल. ग्रीन फिल्ड अंतर्गत सुरत-नाशिक-अहमदनगर-करमाळा-सोलापूर-कर्नल-हैदराबाद- कडप्पा-चेन्नई असा मार्ग तयार करण्यात येणार असल्याचेही साळुंखे यांनी नमूद केले.इन्फोजिल्ह्यातील ६ तालुके कक्षेतजिल्ह्यातील सहा तालुके या महामार्गाच्या कक्षेत आहेत. त्यात सुरगाण्यातील १२ गावे (१७ किमी), पेठमधील ५ गावे (६ किमी), दिंडोरीतील २३ गावे ( ४३किमी), नाशिक ४ गावे (१२ किमी), निफाडच्या ९ गावांचा (१३ किमी), तसेच सिन्नरच्या १६ गावांचा (३२ किमी) त्यात समावेश आहे. नाशिकमधून हा महामार्ग आडगाव, ओढा, विंचूर गवळी, लाखलगाव या भागातून जाणार आहे.

टॅग्स :highwayमहामार्गNashikनाशिक