शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ यांच्या समर्थनार्थ ओबीसींचा सिडकोत मेळावा

By admin | Updated: September 28, 2016 01:17 IST

भुजबळ यांच्या समर्थनार्थ ओबीसींचा सिडकोत मेळावा

सिडको : माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांच्यावर सरकारने आकसापोटी कारवाई केली असून, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सर्व ओबीसी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मान्यवारांकडून करण्यात आले. विशेष म्हणजे नाशिकमध्ये होणाऱ्या मोर्चात माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील उपस्थित राहणार असल्याचेही यावेळी समितीच्या वतीने सांगण्यात आले.माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई आकसपोटी असून, त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी संघटनांकडून येत्या ३ आक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विनंती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज सिडकोतील शुभलक्ष्मी मंगल कार्यालयात आज भुजबळ समर्थकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून मोर्चात सर्व ओबीसी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी करण्यात आले.  यावेळी बाजीराव तिडके, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, अंबादास खैरे, संतोष सोनपसारे, संतोष कमोद, पुंजाराम गामणे, वामनराव जेजूरकर, अ‍ॅड. नितीन सानप, ज्ञानेश्वर जायभावे, संदीप जगझाप, बाळासाहेब सोनवणे, बाळा दराडे, सतीश खैरणार, अनिल आठवले, मंदाकिनी जाधव, शिवाजी बरके, नितीन माळी, साहेबराव गांगुर्डे, संदीप वानखेडे आदिंनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ येत्या तीन आक्टोबरच्या मोर्चात आमदार जितेंद्र आव्हाड हे ओबीसींच्या पाठीशी उभे राहणार असून, या मोर्चात जितेंद्र आव्हाड युवा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (वार्ताहर)