शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ कांदा संकटातकांदा भावात घसरण सुरूच

By admin | Updated: October 25, 2016 22:55 IST

शेतकऱ्यांमध्ये नाराजी : कांद्याची आवक वाढली;

येवला : गेल्या वर्षाच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यातून नवीन लाल कांद्याची आवक दहा पटीने वाढली असून, नाशिकसह काही भागातील शेतकऱ्यांनी एप्रिलपासून साठवून ठेवलेला कांदा आता नव्या कांद्याच्या तुलनेत चवीतदेखील फरक दाखवत असल्याने त्याची मागणी घटली आहे. त्यामुळे साठवण केलेला उन्हाळ कांदा संकटात सापडला असून, भाव मिळण्याची आशा तर सोडाच कांदा फेकण्याची वेळ आल्याने अशा परिस्थितीत शासनाने मदतीचा हात देण्याची अपेक्षा व्यक्त जात आहे.कर्नाटक (बंगळुरू) या मार्केटला सध्या एक लाख क्विंटल लाल कांद्याची आवक होत आहे. येथून संपूर्ण भारतात व परदेशात कांद्याची निर्यात होते. सध्या बंगळुरूला या नवीन लाल कांद्याला ८०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. या मालाचा दर्जा आणि प्रतवारीदेखील चांगली आहे. नाशिक परिसरातील उन्हाळ कांदा हा शेतकऱ्याने एप्रिलमध्ये साठवला आहे. सहा महिने साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणावर खराब झाला. जो कांदा शिल्लक राहिला त्याची गुणवत्ता काहीशी खराब झाली आहे. त्यामुळे लाल नवीन कांद्यापुढे साठवलेला उन्हाळ कांदा फिक्का पडत असल्याने त्याला व्यापारीपेठेत मागणी कमी झाली आहे. याशिवाय येवल्यासह नाशिक परिसरात १० ते १५ नोव्हेंबरपासून नवीन लाल कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात होईल.सध्या उन्हाळ कांद्याला भाव कमी असला तरी उत्पादन खर्चाच्या ४० टक्के रक्कम तरी मोठ्या जिकिरीने मिळत आहे. नुकसान होत असले तरी आता उन्हाळ कांदा मार्केटला आणून कांदा चाळीखाली करण्याशिवाय पर्याय नाही. दीपावलीच्या कालावधीत २६ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत येवला कांदा मार्केट बंद असणार आहे. नोव्हेंबरमध्ये नवा कांदा बाजारात येईल आणि साठवण केलेल्या उन्हाळ कांद्याची कवडीमोल किंमत होईल या धास्तीने येवला कांदा बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक स्थिर असून, बाजारभाव मात्र घसरत आहे. यामुळे आताच कांद्याला भाव नाही तर नव्या पोळ लाल कांद्याला भाव कसा मिळणार, असा सवाल बाजार समितीच्या परिसरात कांदा उत्पादक शेतकरी विचारत आहेत.कांद्याने शेतकऱ्याची पुरती निराशा केली आहे. वाहतूक खर्चदेखील फिटत नसल्याने हवालदिल झाला आहे. उन्हाळ कांदा साठवला तेव्हा १५०० ते २००० रु पये भाव मिळेल अशी अपेक्षा होती. कांदा बाजारभावाला लागलेली उतरती कळा आणि कांद्याचे ४५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत वाईट दिवसाचा सामना करावा लागत आहे. गेल्या १५ दिवसांपासून दररोज कांद्याच्या बाजारभावात सारखा चढउतार चालू आहे.शेतकऱ्याला शेतकामातून थोडी उसंत मिळाली की पुन्हा कांद्याची प्रचंड आवक होईल आणि पुन्हा कांदा भरडला जाण्याची चिन्हे गडद झाली आहे.देशभरात विक्र मी कांदा उत्पादन असताना अतिरिक्त कांदा निर्यात करण्यासाठी शासनाने निश्चित पावले उचलावीत. निर्यात धोरणात कुचराई झाल्याने देशात मोठ्या प्रमाणावर कांदा पडून आहे. याचा फटका कांदा भाव कोसळण्यावर होत आहे. (वार्ताहर)