शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सायखेडा, चांदोरीत वादळासह गारा

By admin | Updated: April 30, 2017 23:54 IST

सायखेडा : गोदाकाठ भागात सायखेडा, चांदोरी, शिंगवे भागात दुपारी ५ वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

सायखेडा : गोदाकाठ भागात सायखेडा, चांदोरी, शिंगवे भागात दुपारी ५ वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.हवामान खात्याने कोणताही अंदाज वर्तवलेला नसताना अचानक झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतात पडून आहे. यंदा याअगोदर गारपीट झाली नाही त्यामुळे आत्ता होणार नाही असे शेतकऱ्यांना वाटत होते. त्यामुळे गाफील असलेल्या शेतकऱ्यांची अचानक तारांबळ उडाली. कांदा साठवणीसाठी ठेवला आहे. मात्र गुदाम, चाळीत साठवणुकीची कामे सुरू आहेत, तर काही शेतकऱ्यांनी अद्याप एकही कांदा साठवला नाही. शेतात कांदा तसाच पोळ स्वरूपात पडलेला आहे. अचानक झालेल्या वादळ व गारपिटीने कांदा झाकण्यासाठी धावपळ करावी लागली, तर अनेक शेतकऱ्यांची द्राक्षबाग कोलमडलेल्या बाजारभावामुळे आणि व्यापारी खरेदी करत नसल्याने पडून होती. आता अचानक झालेल्या गारांनी द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता भुईसपाट झाला आहे. १० रु पये किलोने थोडेफार पैसे हाती पडले असते पण आता तेदेखील पदरात पडणार नाहीत. त्यामुळे शेतकरी या अस्मानी संकटाने पुरता हातघाईस आला आहे. लासलगाव येथेही रविवारी दुपारी कोणत्याही प्रकारचे पावसाळी वातावरण नसताना अचानक मेघ दाटले व दुपारी चार वाजता सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसाने व जोरदार वाऱ्याचे लासलगाव येथील वातावरणात असलेला उष्मा कमी केला. या अवकाळी पावसामुळे लासलगाव येथील आठवडे बाजारात आलेले दुकानदार व शेतकरी तसेच बाजारकरू यांची एकच तारांबळ उडाली. (वार्ताहर)