शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

लुटीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: December 29, 2014 01:46 IST

लुटीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

पंचवटी : पंचवटी पोलीस मुर्दाबाद, गुन्हेगारीला आळा बसलाच पाहिजे, पंचवटी पोलीस हाय हाय, अशा घोषणा देत व्यापाऱ्याच्या झालेल्या लुटीच्या निषेधार्थ संतप्त व्यापारी, शेतकरी व आडत्यांनी दुपारी १ वाजता दिंडोरीरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करून घटनेचा तीव्र निषेध केला. शनिवारी रात्री साडेदहा वाजता विनोद अग्रहरी या व्यापाऱ्यावर हल्ला चढवून लाखो रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती सकाळी बाजार समितीतील व्यापारी, शेतकरी व आडत्यांना मिळताच त्यांनी बाजार समितीतील सर्व लिलाव बंद ठेवून रस्त्यावर धाव घेतली व अचानक रास्ता रोको केला. शेकडोंच्या संख्येने आंदोलनकर्ते रस्त्यावर आल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. आंदोलनकर्त्यांनी थेट रस्त्यावर बसून घेत ‘पंचवटी पोलीस मुर्दाबाद’, अशा घोषणा सुरू केल्या. बाजार समितीबाहेर रास्ता रोको आंदोलन सुरू असल्याचे कळताच पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्त्यांचा आंदोलनात्मक पावित्रा बघून पोलिसांनाही त्यांच्यापुढे नमते घ्यावे लागले. व्यापाऱ्याच्या लुटीच्या रात्री घडलेल्या घटनेत लाखो रुपयांची रोकड गेलेली असतानाही केवळ दोन लाख रुपयांचीच नोंद केली. तसेच वारंवार घटना घडल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीही उपाय योजना केली जात नाही. बाजार समितीत केवळ दोनच कर्मचारी असतात तेदेखील जागेवर राहत नाही.