‘त्या’ सावत्र पित्यास पोलीस कोठडी

By Admin | Updated: March 2, 2015 00:05 IST2015-03-01T23:47:28+5:302015-03-02T00:05:41+5:30

‘त्या’ सावत्र पित्यास पोलीस कोठडी

'That' step father police detention | ‘त्या’ सावत्र पित्यास पोलीस कोठडी

‘त्या’ सावत्र पित्यास पोलीस कोठडी

नाशिक : आई व भावास ठार मारण्याची धमकी देत गेल्या दोन वर्षांपासून स्वत:च्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ पीडित मुलीने या पित्याविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली होती़
आडगाव शिवारातील लाखलगाव विटभट्टी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने दुसरा विवाह केलेला आहे़ या महिलेस पहिल्या पतीपासून पंधरा वर्षांची अल्पवयीन मुलगी असून, ती आजीकडे राहते़ मात्र, आई नाशिकला राहत असल्याने ती आईला भेटण्यासाठी येत असे़ तिच्यावर सावत्र पित्याने वेळोवेळी अत्याचार केल्याने ती गरोदर राहिली़ दरम्यान, ही मुलगी आजीकडे गेल्यानंतर ती गरोदर असल्याचे तिच्या लक्षात आले होते़
या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार सावत्र पित्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलिसांनी या मुलीच्या सावत्र पित्यास अटक केली होती़
त्यास रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ (प्रतिनिधी)

Web Title: 'That' step father police detention