सिन्नर : महसूल व प्रशासन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालय व नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर (एनआयसी) यांच्याकडे पाठपुरावा करून विद्यार्थी व नागरिकांना मिळणाऱ्या उत्पन्न, रहिवास, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आदिंसह विविध दाखले जलदगतीने मिळण्यात येणाऱ्या अनेक दिवसांच्या अडचणीवर यशस्वी मात केली आहे. महाआॅनलाइन प्रणालीअंतर्गत नागरिकांना तहसील व नायब तहसीलदार यांच्या डिजिटल स्वाक्षरीने दाखले वितरीत करण्यात येत होते. या प्रणालीत प्रत्येक दाखला स्वाक्षरी होण्यास काही तासांचा कालावधी लागत होता. तसेच सारखा व्यत्यय येत असल्याने नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत होता. तहसील स्तरावर सर्व प्रयत्न करुनदेखील दाखल्यांवर स्वाक्षरी होत नसल्याने अधिकारी हतबल झाले होते. यावर उपाय काढण्यासाठी तहसीलदार मनोजकुमार खैरनार व प्रशासन नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बायोमेट्रीक प्रणाली आणण्याचा निर्णय घेतला.सकाळी ९ वाजता दोन्ही अधिकाऱ्यांनी कार्यालयात येऊन सर्व दाखले स्वाक्षरीत केले. यापुढे नागरिकांना दाखले देण्यात विलंब होणार नसल्याने अधिकारी व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)
बायोमेट्रिक प्रणालीद्वारे दाखले वितरण सुरु
By admin | Updated: September 29, 2016 01:45 IST
सिन्नर : विद्यार्थी, नागरिकांमध्ये समाधान
बायोमेट्रिक प्रणालीद्वारे दाखले वितरण सुरु
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}