देवळा रस्ता डागडुजीस प्रारंभ

By Admin | Updated: August 4, 2014 00:44 IST2014-08-03T21:08:36+5:302014-08-04T00:44:26+5:30

देवळा रस्ता डागडुजीस प्रारंभ

Start of Deola road repairs | देवळा रस्ता डागडुजीस प्रारंभ

देवळा रस्ता डागडुजीस प्रारंभ

 

ठेंगोडा : सटाणा ते देवळा रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. अकरा कोटी रकमेचे हे काम महिन्याभरातच उखडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने आज प्रसिद्ध करताच शासकीय यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यानुसार या रस्त्याच्या दुरुस्ती व डागडुजीस प्रारंभ करण्यात आला.
अकरा कोटी रुपये खर्चाच्या या सटाणा ते देवळा रस्त्याच्या कामात अनियमितता आहे. तसेच या रस्त्याचे कामही निकृष्टपणे होत आहे. शिवाय हा रस्ता सलगपणे पूर्ण न करता विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याप्रमाणे करण्यात येत आहे. महिनाभरापूर्वी हा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र निकृष्ट काम आणि गुणवत्तेअभावी हे काम महिनाभरातच उखडले गेले. पहिल्या पावसातच या रस्त्यावर जागोजागी मोठमोठाली खड्डे पडली. त्यासंबंधीचे वृत्त आजच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे व डागडुजीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. मात्र या रस्त्याची केवळ डागडुजी करून उपयोग नाही, तर रस्ता कामाची
उच्च अधिकाऱ्यांनी मूल्यमापन करावे, अशी मागणी उपसरपंच प्रकाश
बागुल व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Start of Deola road repairs