शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर फिरणाऱ्यांची जागेवरच अँटिजन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 01:43 IST

शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांमधील सुपर स्प्रेडर्स शोधून काढण्यासाठी यापूर्वी संबंधित नागरिकांची उचलबांगडी करण्याच्या पद्धतीत आता बदल करण्यात आला आहे. पोलिसांबरोबरच आता महापालिकेचे वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात येणार आहे. रस्त्यावर अचानक फिरणारे नागरिक आढळले की, त्यांना त्याच ठिकाणी अडवून त्यांची अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपथक : स्प्रेडर्स रोखण्यासाठी आयुक्तांचा निर्णय

नाशिक : शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांमधील सुपर स्प्रेडर्स शोधून काढण्यासाठी यापूर्वी संबंधित नागरिकांची उचलबांगडी करण्याच्या पद्धतीत आता बदल करण्यात आला आहे. पोलिसांबरोबरच आता महापालिकेचे वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात येणार आहे. रस्त्यावर अचानक फिरणारे नागरिक आढळले की, त्यांना त्याच ठिकाणी अडवून त्यांची अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे बाधित आढळले की, त्यांना गृहविलगीकरणात राहावे लागेल; अन्यथा कोविड सेंटर्समध्ये दाखल केले जाणार आहे. नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आरोग्य नियमांचे पालन केले जात नाही, हे त्यातील मुख्य कारण असले तरी बाधित होऊनही लक्षणे नसलेले; परंतु इतरांमध्ये या संसर्गाचा फैलाव करणाऱ्यांचा मुक्त संचार सर्वाधिक अडचणीचा ठरला आहे. त्यामुळे महापालिकेने गेल्या फेब्रुवारी- मार्च महिन्यांतच नागरिकांशी थेट संबंध येणाऱ्या महापालिका आणि बँक अधिकारी कर्मचाऱ्यांपासून रिक्षाचालक, भाजीविक्रेते, किराणा दुकानदार अशी सर्वांचीच अँटिजन चाचणी करून सुपर स्प्रेडर्स शोधण्याचा प्रयत्न केला होता. शहरातील पंचवटी कारंजा, सिडकोसह अनेक ठिकाणी महापालिका आणि पाेलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांना थेट महापालिका रुग्णालयात नेऊन कोरोना चाचण्या केल्या होत्या. त्यात अनेक सुपर स्प्रेडर्सचा शोध घेण्यात महापालिकेला यश आले होते. दरम्यान, आता आयुक्त कैलास जाधव यांनी शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सुपर स्प्रेडर्सची शोधमोहीम गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आता पूर्वीच्या कार्यपद्धतीत बदल केला आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या नागरीकांना अडवून त्यांना एका वाहनात बसवून रुग्णालयापर्यंत नेण्याऐवजी आता महापालिकेच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एक शिक्षक, असे पथक तयार केले असून, ते पोलिसांच्या बरोबर असेल. रस्त्यावर फिरणारे नागरिक आढळले की, त्यांना तेथेच अडवून त्यांची अँटिजन चाचणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ करतील, तर संंबंधित नागरिकाची माहिती शिक्षक गुगलशीट आणि पोर्टलवर भरतील. त्यामुळे सुपर स्प्रेडर्सला शोधून त्यांच्यापासून अन्य नागरिकांना होणारा संसर्ग टाळण्यात येणार आहे. यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी आदेश जारी केला आहे.स्प्रेडर्समुळे होणारा संसर्ग टळेलमहापालिकेने यापूर्वी राबवलेल्या कार्यपद्धतीत नागरिकांना पडकून एकाच वाहनातून महापालिकेच्या रुग्णालयात नेले जात असे आणि त्यानंतर चाचणी केली जात असे; परंतु एकाच वाहनातून जाताना एखाद्या सुपर स्प्रेडरमुळे अन्य नागरिकांना धोका पोहोचू शकतो. त्यामुळे कार्यपद्धतीत आयुक्तांनी बदल केला आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या