मेलडी बीट्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: September 16, 2014 23:43 IST2014-09-15T22:44:35+5:302014-09-16T23:43:42+5:30

मेलडी बीट्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to Melody Beats | मेलडी बीट्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

मेलडी बीट्सला उत्स्फूर्त प्रतिसाद


नाशिक : गीतांची सुरेल मैफल, नृत्याचा नजराणा व धमाल कॉमेडीचा तडका असा मनोरंजनाचा त्रिवेणी संगम असलेल्या ‘मेलडी बीट्स’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘लोकमत’च्या वतीने लोकमत सखी मंच सदस्य, प्रिव्हिलेज कार्डधारक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित या कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सोनी गिप्ट्सचे संचालक नितीन मुलतानी, फ्रावशी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रतन लथ, कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव, सौ. अंजली जाधव, उद्योजक अजय ब्रह्मेचा, सौ. नीता ब्रह्मेचा, सोनचाफा पी. आर. वैशंपायन अ‍ॅण्ड सन्सच्या संचालक सौ. कुंदा वैशंपायन, वेदआयुर आयुर्वेदिक क्लिनिकच्या डॉ. ऐश्वर्या गडगरी, खाबिया ग्रुपचे संचालक प्रवीण खाबिया, सौ. सपना खाबिया, रॉयल हेरिटेजच्या संचालक सौ. मुग्धा शहा आदि उपस्थित होते.
प्रारंभी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी प्रास्ताविक केले. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या वतीने अजय ब्रह्मेचा यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गायक अभिजित कोसंबी, प्रसेनजित कोसंबी, सुषमा हेरम यांनी विविध हिंदी, मराठी गीते सादर केली. अनेक गीतांना रसिकांनी उत्स्फूर्तपणे ठेका दिला. काही गीतांना ‘वन्स मोअर’ही मिळाला. काही गीतांवर सेवा मोरे यांनी सादर केलेली नृत्ये दिलखेचक होती. डी. महेश यांनी केलेली मिमिक्री रसिकांना भावली.
म्युझिक लव्हर्स इंटरनॅशनलच्या वाद्यवृंदाने यावेळी साथ दिली. त्यामध्ये प्रशांत महाले (की-बोर्ड), फारुख पिरजादे (ढोलक), नीलेश सोनवणे, गणेश जाधव (गिटार), प्रवीण मुळे (ड्रम) यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा सामसुखा यांनी केले.

Web Title: Spontaneous response to Melody Beats