शिवशक्ती चौकातील समस्या सोडवाव्यात

By Admin | Updated: August 3, 2014 01:59 IST2014-08-03T01:31:12+5:302014-08-03T01:59:20+5:30

शिवशक्ती चौकातील समस्या सोडवाव्यात

Solve problems in Shivshakti Chauk | शिवशक्ती चौकातील समस्या सोडवाव्यात

शिवशक्ती चौकातील समस्या सोडवाव्यात

 

सिडको : येथील शिवशक्ती चौकातील विविध समस्या मार्गी लावाव्यात, याबाबत परिसरातील रहिवाशांनी मनपाविरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांना निवेदन दिले.
सिडकोतील शिवशक्ती चौकातील बंद अवस्थेतील मलनिस्सारण केंद्रामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. बंद असलेल्या मलनिस्सारण केंद्राच्या परिसरात संपूर्ण अंधार पसरलेला असतो. तसेच रात्रीच्या सुमारास टवाळखोरांचाही बंदोबस्त करावा. याबरोबरच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील समस्यांबाबत मनपा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसून आमच्या समस्या सुधाकर बडगुजर यांनी सोडवाव्यात, अशा मागणीचे निवेदन यावेळी रहिवाशांनी दिले. याप्रसंगी के. पी. पवार, जोशी, प्रशांत बागुल, पांडुरंग वाघ, एल. पी. चव्हाण, अनिल येवले, भागवत कुलकर्णी, सचिन व्यवहारे, सोमनाथ आचारी, विलास सोनवणे, प्रकाश टापरे, गणेश घोगरे, मनीष सपकाळे, विजय पाटील, राहुल हिरे यांसह परिसरातील रहिवासी उपस्थित होते. यावेळी सुधाकर बडगुजर यांनी समस्या जाणून घेतल्या व त्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन रहिवाशांना दिले. (*वार्ताहर)

Web Title: Solve problems in Shivshakti Chauk