शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

सामनगावरोडला झोपड्या जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:28 AM

सामनगावरोड रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्राशेजारील पाटबंधारे विभागाच्या बुजवलेल्या पाटावर अनधिकृत ७० ते ८० कच्च्या- पक्क्या झोपड्यांपैकी काही रहिवाशांनी स्वत:हून झोपडीचे अतिक्रमण काढून घेतले. दुपारनंतर मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने उर्वरित झोपडपट्ट्या जमीनदोस्त केल्या.

नाशिकरोड : सामनगावरोड रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्राशेजारील पाटबंधारे विभागाच्या बुजवलेल्या पाटावर अनधिकृत ७० ते ८० कच्च्या- पक्क्या झोपड्यांपैकी काही रहिवाशांनी स्वत:हून झोपडीचे अतिक्रमण काढून घेतले. दुपारनंतर मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने उर्वरित झोपडपट्ट्या जमीनदोस्त केल्या.  सामनगावरोड येथील शासकीय तंत्रनिकेतन व रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्राच्या मध्ये असलेल्या पाटबंधारे विभागाच्या बुजवलेल्या पाटावर गेल्या काही वर्षांपासून कच्च्या पक्क्या झोपड्यांचे अतिक्रमण झाले होते. तेथील ६३ झोपडपट्टीवासीयांना सामनगावरोड अश्विन कॉलनी जवळील जयप्रकाशनगर घरकुल योजनेत घरे देण्यात आली आहे. तरीदेखील रहिवासी त्याचठिकाणी अनधिकृत झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास होते. रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्राच्या सुरक्षितेच्या दृष्टीनेदेखील त्यांनी अनेकवेळा मनपाकडे अतिक्रमण काढण्याबाबत पाठपुरावा केला होता. याबाबत मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने झोपडपट्टीवासीयांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत पूर्वसूचनादेखील दिली होती.अतिक्रमण उपायुक्त रोहिदास बहिरम, अधीक्षक महेंद्र पगारे, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, सुनीता कुमावत, नितीन नेर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे ६० कर्मचारी, ६ गाड्या, दोन जेसीबी बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तात दाखल झाले. अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी झोपडपट्टीवासीयांना नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले.कुठलाही वादविवाद न घालता काही झोपडपट्टीवासीयांनी स्वत:हून आपले कच्चे-पक्के झोपडीचे अतिक्रमण काढून घेतले. दुपारी तीननंतर अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने उर्वरित झोपड्या जमीनदोस्त केल्या. त्या ठिकाणी असलेले एक धार्मिक स्थळदेखील विधिवत हलविण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण