पंचवटी आगार प्रकरणी सहा संशयित ताब्यात

By Admin | Updated: December 16, 2015 00:09 IST2015-12-16T00:05:18+5:302015-12-16T00:09:03+5:30

पंचवटी आगार प्रकरणी सहा संशयित ताब्यात

Six suspects in Panchavati Depot | पंचवटी आगार प्रकरणी सहा संशयित ताब्यात

पंचवटी आगार प्रकरणी सहा संशयित ताब्यात

पंचवटी : बस आगारात धुडगूस घालून सुरक्षारक्षक, तसेच बसचालकावर सशस्त्र प्राणघातक हल्ला करणाऱ्या वाल्मीकनगर येथील सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एसटी बसचा धक्का लागल्याच्या कारणावरून सोमवारी सायंकाळच्या सुमाराला वाल्मीकनगर (वाघाडी) परिसरात राहणारे मोहन भास्कर गायकवाड, सचिन भास्कर गायकवाड यांच्यासह सुमारे सात विधीसंघर्षीत साथीदारांनी बस आगारात सायंकाळच्या सुमारास, आम्हाला डेपो मॅनेजरला भेटायचे आहे असे सांगून सुरक्षारक्षक शंकर हरि गाढवे यांच्याशी वाद घालत, त्यांना शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. त्याचवेळी चालक नितीन जाधव यांनी वाद मिटविण्यासाठी धाव घेतली असता संशयितांनी गाढवे यांच्या पोटावर व हातावर धारदार शस्त्राने वार केले.

Web Title: Six suspects in Panchavati Depot