शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरचे प्रकल्प पूर्ण करणार!

By admin | Updated: November 18, 2016 00:53 IST

निवडणूक : प्रचार सभेत मुख्यमंत्र्याचे आश्वासन

सिन्नर : काम करणाऱ्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा राहतो. त्यामुळे सिन्नर शहराच्या विकासाचे जेवढे प्रकल्प असतील, त्यासाठी पैसा कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पालिका निवडणुक प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची हुतात्मा चौकात सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार माणिकराव कोकाटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव, लक्ष्मण सावजी, वसंत गिते, प्रशांत पाटील, सुरेश पाटील, नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, शहराध्यक्ष पंकज जाधव, भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, राजेश नवाळे, चंद्रकांत वरंदळ, राहूल बलक, दिलीप शिंदे, थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशोक मोरे यांच्यासह भाजपाचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. शहरे बदलण्यासाठी पैसे लागत नाही. त्यासाठी द्रष्टा नेता असावा लागतो. सुदैवाने सिन्नरकरांना कोकाटे यांच्यासारखा दूरदृष्टी असणारा नेता लाभल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सिन्नरला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रयत्न करा, पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे ते म्हणाले. गेल्या ६०-७० वर्षात महिलांसाठी शौचालये बांधता आली नाही याला विकास म्हणता येणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी कडवा धरणातून राबविण्यात येणारी पाणीयोजना, नाविन्यपूर्ण विंड मिल, प्रशासकीय इमारत व पालिका रुग्णालयाच्या अपूर्ण कामासाठी निधी देण्याची मागणी कोकाटे यांनी केली. त्याचबरोबर पूर्व भागातील ४० गावे टॅँकरमुक्त करण्यासाठी देवनदी वळण योजनेसाठी वर्क आॅर्डर देण्याची मागणी कोकाटे यांनी केली. योजनांना पैसा द्या, मी सिन्नरला स्मार्ट सिटी बनवून दाखवतो अशी ग्वाही कोकाटे यांनी दिली. मुख्यमंत्र्यावर विश्वास असून ते या निधी देतील असा विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)