एकाच दिवसात पाच घरफ ोड्यातीन दुचाकींचीही चोरी

By Admin | Updated: July 23, 2014 00:26 IST2014-07-22T23:38:10+5:302014-07-23T00:26:11+5:30

पाच लाखांचा ऐवज लंपास

In a single day, theft of two wheelers in five houses and three wheelers | एकाच दिवसात पाच घरफ ोड्यातीन दुचाकींचीही चोरी

एकाच दिवसात पाच घरफ ोड्यातीन दुचाकींचीही चोरी

नाशिक : घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत़ सोमवारी शहरात चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफ ोड्या केल्या असून, तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत़ आडगाव, उपनगर, इंदिरानगर, अंबड, भद्रकाली या परिसरात झालेल्या या घटनांमध्ये सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला़ या चोरट्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जाते आहे़
मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेलसमोरील महालक्ष्मीनगरच्या सुवर्णासिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणारे योगेश पवार (३१) हे बाहेरगावी गेले होते़ त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल असा एक लाख ५३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला़ दुसरी घटना बळीराजनगरमध्ये घडली़ संजय गवळी (४७, श्रीगणेश बंगला, सर्व्हे नंबर २५२, सेवक आॅटो केअर) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६१ हजार ३०० रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल चोरून नेला़ नाशिक-पुणे रोडवरील दत्तात्रय बापू साळी (४७, रा़ गुरुकृपा, नासर्डी पूल, नाशिक्लबसमोर, नाशिक) यांच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून कारचे सीडी प्लेअर, स्क्रीन टच व्हिडीओ प्लेअर, स्पीकर, सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डवर व गल्ल्यातील रोख रक्कम असा एकूण ८६ हजार ७८ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ इंदिरानगर परिसरातील राजसारथी सोसायटीत राहणाऱ्या ज्योती पवार यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, १७ ग्रॅमची चेन, चांदीचे व पितळी भांडे असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़
अंबड येथील बाळू गवळी (५३) यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या घरफ ोड्यांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ या घटनांबरोबरच दुचाकी चोरीच्या घटनाही घडत असून, शंकरनगरचे अभिषेक शिंदे यांची बुलेट (एमएच १५ डीवाय ४००५), शिंगाडा तलाव येथील शिवाजी नाईक यांची स्कूटर (एमएच १५ एस ६११७) व निफाड तालुक्यातील ओणे येथील सुजित कातकाडे यांची हिरोहोंडा दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली़ (प्रतिनिधी)

Web Title: In a single day, theft of two wheelers in five houses and three wheelers