शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘पिवळे सोनं’ काळवंडण्याची चिन्हे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:24 IST

कोरोना व्हायरसच्या धसक्याने पोल्ट्री उत्पादकांकडून मका पिकास मागणी कमी झाली आणि उन्हाळ मक्याचे उत्पादन वाढल्याने मक्याच्या दरात घसरण होत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पिवळे सोने फिके पडले असून, पुढील भवितव्य धोक्यात आल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम । हमीभाव मिळत नसल्याने मका उत्पादक चिंतित

येवला : कोरोना व्हायरसच्या धसक्याने पोल्ट्री उत्पादकांकडून मका पिकास मागणी कमी झाली आणि उन्हाळ मक्याचे उत्पादन वाढल्याने मक्याच्या दरात घसरण होत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पिवळे सोने फिके पडले असून, पुढील भवितव्य धोक्यात आल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.मक्याचे दर प्रतिक्विंटल २२०० पासून १४०० वर आले आहेत. नजीकच्या काळात आणखी हे सोनं काळवंडणार नाही याची काळजी शासनस्तरावर घ्यावी व मक्यास हमीभाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. फेडरेशनद्वारा खरेदी विक्र ी संघामार्फत हमीभावाने मक्याची खरेदी करावी. येवल्यासह सभोवतालचा परिसर मक्याचे मोठे आगर आहे. तालुक्याचे हे नगदी पीक आहे. येवला तालुक्यासह परिसरात शेतकरी कांद्यानंतरचे नगदी पीक म्हणून मका पिकास शेतकरी प्राधान्य देतात.सध्या मका भाव प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रु पयाने घसरले आहे. त्यामुळे मुळातच अडचणीत असलेला शेतकरी मक्याचे दर कमी झाल्याने चिंतित आहे. कोरोना व्हायरसमुळे मका निर्यात थंडावली आहे. याशिवाय केंद्र शासनाने मका मोठ्या प्रमाणावर आयात करण्यात आल्याची चर्चा शेतकरी करीत आहे.

शासनस्तराहून उपाययोजना करण्याची मागणी : कुकुटपालन व्यवसाय धोक्यात आल्याने शेतकरी शासनाकडे आधारभूत किंमत मागणी करीत आहेत. खरीप हंगामातील मक्याचे दर व उन्हाळा कांदा रोपांची कमतरता यामुळे यंदा रब्बीतही मक्याचे बंपर पीक येण्याची शक्यता आहे. शेती आणि शेतकरी धोक्यात येऊ नये, यासाठी शासनस्तराहून गांभीर्याने उपाययोजना करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

मक्याचे दर धोक्यात आले तर शासनाने हमीभाव द्यावा व खरेदी करावी. किमान २२०० रु पये प्रतिक्विंटल दर द्यावा. अन्यथा शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत जातील. शेती व्यवसाय आता करावा की नाही याची चिंता आहे. अस्मानी आणि सुलमानी संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, पिकांना हमीभाव मिळणे गरजेचे आहे.- सुदाम माळी, मका उत्पादक शेतकरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्ड