नाशिक : पारिजातनगर चौफुलीवर अपघात वाढल्याने सिग्नल बसविण्यात यावा, अशी मागणी स्नेहबंधन गु्रप व परिसरातील नाागरिकांची मनपा स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्याकडे केली. ज्यामुळे गांगुर्डे यांनी लवकरच सिग्नलचे काम करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. पारिजातनगर चौफुलीवर गेल्या काही दिवसांपासून अपघात वाढले आहे. त्यामुळे येथील चौफुलीवर सिग्नल बसविण्याची मागणी स्नेहबंधन गु्रप व परिसरातील नागरिकांनी केली. यासंबंधीचे निवेदन शिवाजी गांगुर्डे यांना देण्यात आले. आम्ही या निवेदनावर ग्रुपचे अध्यक्ष रमेश कडलग,अनिल कुलकर्णी, प्रवीण कळमकर, किशोर संतापूरकर , उत्तमराव पाटील, अमित मैंद, प्रदीप हरकरे, अमोल गांगुर्डे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}