शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शुभमंगल आता सावधान!

By admin | Updated: November 15, 2016 02:02 IST

नवा कायदा : विवाह मंडळे अडकणार नियमांच्या बंधनात

संजय पाठक नाशिकविवाह नोंदणी नागरिकांना बंधनकारक असली तरी आता त्याही पुढे जाऊन विविध विवाह मंडळांनाच कायद्याच्या ‘बंधना’त अडकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विवाह नोंदणी करणाऱ्या मंडळांना नियम अटींचे पालन करावे लागणार आहेच, परंतु विवाह नोंदणीची जबाबदारीदेखील पार पाडावी लागणार आहे. अशा प्रकारच्या नोंदणीत अटी-शर्तीचा भंग केल्यास सहा महिने कारावास भोगावा लागेल.अर्थात, ज्या महापालिका क्षेत्रात या विवाह संस्था आहेत, त्यांना यानिमित्ताने नियमांच्या जाळ्यात अडकविले जाणार असले तरी आॅनलाइन विवाह जुळविणाऱ्या अनेक संस्था असून, त्यांची नोंदणी कशी होणार हा मात्र प्रश्नच आहे. सध्या विवाह जुळविणे हे सामाजिक कार्य न राहता त्याला व्यवसायाचे स्वरूप आले असून, हजार रुपयांचे शुल्क इच्छुक उपवर-वधूच्या कुटुंबीयांकडून वसूल केले जातात. व्यावसायिक मॅरेज ब्युरोंबरोबरच ज्ञाती संस्थांचीही विवाह मंडळे आहेत. तेही विवाहांसाठी मेळावे घेऊन विवाह लावून देत असतात. परंतु आजमितीला त्यासाठी स्वतंत्र नोंदणी नव्हती; मात्र आता शासनाने या सर्व मंडळांना नोंदणीखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन हजार रुपयांचे शुल्क भरून प्रत्येक विवाह मंडळाला महापालिका किंवा विवाह नोंदणी निबंधकांकडे अर्ज भरून मान्यता प्रमाणपत्र मिळावावे लागणार आहे. अशाप्रकारच्या नोंदणीसाठी दोन हजार रुपये खर्च असून विवाह मंडळ किंवा संस्थेने दिलेल्या माहितीची पडताळणी करून हे नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे नोंदणीप्रमाणपत्राचे दर दोन वर्षांनी नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे. याशिवाय नोंदणीनंतर कायद्यातील सर्व अटी-शर्तींचे पालन करावे लागणार असून, तसे न केल्यास संबंधित व्यवसायिकास वा संस्थाचालकास नोटीस बजावून नोंदणीपत्र रद्द करण्यात येणार आहे.