शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या नाराजांना शिवसेनेचे पाठबळ

By admin | Updated: January 20, 2017 01:04 IST

गळ टाकणे सुरू : बंडखोरांच्या बैठकीला पदाधिकाऱ्यांची हजेरी

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या निष्ठावानांना डावलून दलबदलंूना संधी दिली जात असल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन भाजपाच्या स्थानिक नेतृत्वालाच आव्हान देण्याचे प्रकार सुरू आहेत. बुधवारी रात्री अशाच एका नाराजाच्या बैठकीत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याने आता नाराजांना शिवसेनेकडून पाठबळ दिले जात असल्याचे उघड आहे. ज्या प्रभागात शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नाही, अशा जागांवर भाजपातील नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यातील सत्तेमुळे नाशिक महापालिकेत भाजपाची सत्ता येणारच अशा आविर्भावात सध्या पक्षाचे कामकाज सुरू असून, पक्षातील काही नेत्यांच्या वारसांना प्रस्थापित करण्यासाठी विरोधकांना आपलेसे करण्यासाठी पक्षप्रवेश दिला जात आहे. त्यामुळे भाजपात नव्या-जुन्यांचा वाद उफाळून आला आहे. भाजपात अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या लाटेत सहभागी होण्यासाठी आलेल्या अन्य पक्षांतील दलबदलूंमुळे निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. त्यामुळे भाजपाच्या अशा नाराजांची नाशिकरोड पाठोपाठ बुधवारी पंचवटी येथे बैठक झाली. शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या प्रभागातच बैठक घेऊन या नाराजांनी त्यांना आव्हान दिले आहे. या प्रभागातील ११ इच्छुक उमेदवार या बैठकीस उपस्थित होते. याचवेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, अ‍ॅड. शिवाजी सहाणे आणि विनायक खैरे यांनी या बैठकीला हजेरी लावली. तसेच शिवसेनेसाठी गळ घातली. ११ इच्छुकांपैकी किमान दोघांना भाजपाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी होती. हीच मागणी शिवसेनेकडे रेटण्यात आली असल्याचे वृत्त आहे. या प्रभागात शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नाही, तसेच अनेक प्रभागात अशीच स्थिती असून, मनसे किंवा अन्य पक्षांतून आयात केलेले उमेदवारही प्रभावी ठरणार नसल्याने मूळ भाजपेयींना पक्षात घेऊन भाजपालाच अडचणीत आणण्याची खेळी शिवसेनेकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)