शिवराज्यात नीती, मती अन मातीला किंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 17:36 IST2018-11-29T17:35:52+5:302018-11-29T17:36:50+5:30

येवला : शिवरायांचा एक जरी गुण जीवनात आचरणात आणला, तरी जीवनाचे सार्थक होईल. एकहीम हिलेवर अत्याचार होणार नाही. छत्रपतींच्या राज्यात जातीला नव्हे, होती, असे प्रतिपादन सुदाम खालकर यांनी केले.

In Shivraj, the price of Nitish, Mathi and Soil | शिवराज्यात नीती, मती अन मातीला किंमत

शिवराज्यात नीती, मती अन मातीला किंमत

येवला : शिवरायांचा एक जरी गुण जीवनात आचरणात आणला, तरी जीवनाचे सार्थक होईल. एकहीम हिलेवर अत्याचार होणार नाही. छत्रपतींच्या राज्यात जातीला नव्हे, होती, असे प्रतिपादन सुदाम खालकर यांनी केले.
समता प्रतिष्ठान येवला आयोजित प्रागतिक विचार व्याख्यान मालेचे तिसरे पुष्प छत्रपती शिवाजी महाराज आ िणआजचा तरु ण या विषयावर गुंफताना खालकर बोलत होते. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना स्वाभिमान शिकविला. सर्व जातीच्या पोरांना आपल्या बरोबर घेतले. आज आम्हाला हे शिवाजी महाराज कुणी सांगत नाही.कोयना नदीवर ३५०वर्षांपूर्वी बनवलेला पूल आजही तसाच आहे. एकही दगड ढासळलेला नाही. शासनाने फ्री मेंटेनन्स ब्रीज असे नाव या पुलाला दिले आहे. हे छत्रपती नाही शिकवले जात आम्हाला. छत्रपतीना जातीय संघर्ष नव्हे, तर सत्ता संघर्ष करावा लागला. छत्रपती मुस्लिम बांधवा विरोधात नव्हते, हे समजून घेतले पाहिजे. छत्रपती स्थापत्य शास्त्र, आरमार शास्त्र, वास्तुशास्त्र, उत्तम अभियंता, विज्ञान निष्ठ, उत्तम योद्धा असे अनेक पैलू महाराजांकडे होते. एखादा मुलगा सहली साठी जात असेल तर त्याची आई, बाप त्याला बसमध्ये पुढे,मागे नाही मधोमध बसावे असे समजून सांगतात, मग आजचा बाप कुठे अन पुरंदरच्या तहाच्या वेळी स्वत:चा मुलगा सर्जा संभाजीला स्वराज्यासाठी गहाण ठेवणारा छत्रपती असलेला बाप कुठे? रयत जगली पाहिजे या साठीच हे धाडस होतं, जीवनात नैराश्य आले तर छत्रपतींचा पुरंदरचा तह डोळ्यासमोर आणावा. छत्रपतींचा एक तरी गुण आचरणात आणावा, यामुळे आयुष्यभर अडचण येणार नाही, असेही खालकर म्हणाले.

 

Web Title: In Shivraj, the price of Nitish, Mathi and Soil