शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

येवल्यात  शिवसेनेचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:49 PM

येवला : विधान परिषदेच्या निवडणुकीत नरेंद्र दराडे विजयी झाल्याची वार्ता येवला शहर व तालुक्यात पोहचताच जल्लोष करण्यात आला. विधानसभेत छगन भुजबळ आणि आता विधान परिषदेत नरेंद्र दराडे असे दोन आमदार येवल्याला मिळाल्याने आतषबाजीसह गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप केले. ढोल-ताशाच्या गजरात व हलकडीच्या कडकडाटात झाला.

ठळक मुद्देदराडे यांची विजयी मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण

येवला : विधान परिषदेच्या निवडणुकीत नरेंद्र दराडे विजयी झाल्याची वार्ता येवला शहर व तालुक्यात पोहचताच जल्लोष करण्यात आला. विधानसभेत छगन भुजबळ आणि आता विधान परिषदेत नरेंद्र दराडे असे दोन आमदार येवल्याला मिळाल्याने आतषबाजीसह गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी मिठाईवाटप केले. ढोल-ताशाच्या गजरात व हलकडीच्या कडकडाटात झाला. सायंकाळी विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  प्रारंभी विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. कार्यकर्त्यांनी दराडे यांच्या विजयाचा जल्लोष करत घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसर दणाणून गेला होता. दराडे सेनेत असले तरी त्यांचा संपर्क भुजबळांशी कायम राहिला आहे. २००४मध्ये विधानसभेत ओबीसी एकजूट कायम ठेवण्यासाठी दराडे यांनी एक पाऊल मागे घेतले होते. त्याची परतफेड भुजबळ यांनी केली, अशी चर्चादेखील आहे. दरम्यान, येवल्याला २५ वर्षांनंतर स्थानिक आमदार मिळाला असल्याचा आनंद आहे, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी म्हटले आहे. मिरवणुकीत सजवलेल्या वाहनावर भगवा फेटा परिधान करून नरेंद्र दराडे यांच्यासह शिवसेनेचे नेते संभाजी पवार व रामदास दराडे सहभागी झाले होते.

आमदार झाल्याने स्वप्न साकार

माझा भाऊ (नरेंद्र) मला आमदार म्हणून पाहायचा आहे, हे आईचे स्वप्न आज खरे झाले; परंतु त्या आज नाहीत. त्यांची आई कडक शिस्तीची. शेळीपालन व्यवसाय सांभाळत मुलांवर चांगले संस्कार करीत मोठे केले. गुण्यागोविंदाने आपला परिवार एकत्रित ठेवला. आईचे स्वप्न व आशीर्वाद आज सत्यात उतरले. यात परिवाराचे मोठे योगदान आहे. अवघा सारा परिवार एकत्रित आहे.दराडे यांचा जिल्ह्यात दांडगा संपर्कज्येष्ठ बंधू नरेंद्र दराडे यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करायचेच ही खुणगाठ बांधून कामाला लागलेले किशोर दराडे यांनी विधान परिषद हे लक्ष करीत कसमा पट्ट्यासह जिल्हाभरात दिवाळीभेट करीत जिल्ह्यातील सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी जवळीक साधली. येवला भेटीत येणारा जिल्ह्यातील प्रत्येक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य मतदार यांच्याशी केलेला प्रेमाचा व्यवहार यामुळे मतदारांच्या मनात दराडे यांनी घर तयार केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा अनुभव पाठीशी असल्याने जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झाले. स्वत:च्या शिक्षण संस्थेत असलेले विश्वासू सेवक यांचे सहकार्य, यातून झालेले सूक्ष्म नियोजन, एका एका मतदाराच्या संपर्कात असणारे कार्यकर्ते, त्या मतदाराच्या मानसिकतेचा अभ्यास, त्यातून नियमितपणे केलेले डॅमेज कंट्रोल फळास आले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाVidhan Parishadविधान परिषद