शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-राष्टवादीत दुरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:50 IST

उमेदवारी माघारीनंतर सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ९ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

सिन्नर : उमेदवारी माघारीनंतर सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ९ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. प्रत्यक्षात ९ उमेदवार दिसत असले तरी खरी लढत शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे व राष्टÑवादीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यात होणार असल्याचे दिसते.सिन्नर मतदारसंघात पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारण नेहमीच दिसून आले आहे. त्यामुळे लढत राष्टÑवादी-शिवसेना असली तरी कोकाटे-वाजे गटातच लढत होईल. मनसेने सिन्नर मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. पक्षापेक्षा व्यक्तीला मानणारे कार्यकर्ते व मतदार असल्याने बंडखोरीचा प्रश्न निर्माण झाला नाही.गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना व भाजप अशी चौरंगी लढत दिसत होती. मात्र खरी लढत शिवसेनेचे वाजे व भाजपचे कोकाटे यांच्यातच झाली होती. गेल्यावेळी कॉँग्रेसकडून संपत काळे, तर राष्टÑवादीकडून शुभांगी गर्जे उमेदवार होत्या. त्यात वाजे यांनी कोकाटे यांच्यावर २० हजार ५०० मतांनी विजय मिळविला होता. प्रतिस्पर्धी उमेदवार कोकाटेवगळता सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.निवडणुकीत राष्टÑवादी, शिवसेना, बसपा, महाराष्टÑ क्रांती सेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहर जनशक्ती व अपक्ष असे उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत दुरंगी होणार आहे. शिवसेनेचे राजाभाऊ वाजे व राष्टÑवादीचे माणिकराव कोकाटे असा दुरंगी सामना रंगणार आहे.लोकसभेपेक्षा२० हजार मतदार वाढले लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत सुमारे २० हजार मतदार वाढले आहेत.३ लाख ७७ एकूण मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार१ लाख ५८ हजार ४९४ असून, महिला मतदारांची संख्या १ लाख ४१ हजार ५८३ आहे.रिंगणातील उमेदवार... राजाभाऊ वाजे (शिवसेना), माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी), राजू मोरे (बसपा), मनोहर दोडके (महाराष्टÑ क्रांती सेना), विक्रम कातकाडे (वंचित बहुजन आघाडी), शरद शिंदे (प्रहर जनशक्ती), किरण सारुक्ते (अपक्ष), विलास खैरनार (अपक्ष) व रामचंद्र जगताप (अपक्ष).२०१४ मध्ये होते ११ उमेदवार । यंदा आहेत एकूण ९ उमेदवार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019sinnar-acसिन्नरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस