शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला

By admin | Updated: February 11, 2015 00:55 IST

संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला

भक्तीरसात आकंठ बुडालेल्या भाविकाला आस असते भगवंताची. भगवंताच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांच्या आड वय, श्रम आणि वेदनांचा व्यत्यय येत नसल्याचा प्रत्यय संत गजाननाच्या दर्शनासाठी वनोजाहून ११५ किलोमीटर अंतर पायी कापणार्‍या ७६ वर्षीय भाविकाकडे बघून येतो. वाशिम जिल्ह्यातील उकळी पेन येथील नामदेव राऊत हे या भक्ताचे नाव आहे. त्यांचे वय ७६ वर्षे असून, या वयात ते ११५ किलोमीटर अंतर पायी कापतात.नामदेव राऊत दरवर्षी संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जातात. त्यासाठी गत ११ वर्षांंपासून ते पायदळवारीमध्ये सहभागी होतात. वनोजा येथून हृषिकेश महाराजांची पालखी दरवर्षी शेगावसाठी रवाना होते. या पालखीसोबत वनोजा येथील महिला, पुरूष, तरूण, वयोवृद्ध नागरिक दरवर्षी शेगावला दर्शनासाठी जातात. वनोजा ते शेगापर्यंंतचे अंतर ११५ किमी आहे. ४ फेब्रुवारी रोजी वनोजाहून निघालेली ही पालखी ९ फेब्रुवारीपर्यंंत शेगावला पोहोचते. ११ फेब्रुवारी रोजी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर वारकरी परततात. या पालखीत उकळी पेन येथील नामदेव राऊतही सहभागी होतात. यापूर्वी राऊत यांनी पंढरपूर, आळंदी येथे पायदळ वारीत जाऊन भगवंताचे दर्शन घेतले आहे. पायदळ वारीबद्दल मनोगत व्यक्त करताना राऊत म्हणाले, की भगवंताची आस लागल्यामुळे आपण संत गजानन महाराजांच्या पायदळ वारीत सहभागी होतो. यामुळे आपल्याला मनस्वी आनंद मिळतो. पायी चालताना थकवा किंवा त्रास कधीच होत नाही, असे त्यांनी सांगितले.