शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी सात महिला स्पर्धेत

By admin | Updated: February 25, 2017 01:33 IST

जिल्हा परिषद : युतीसाठी सेनेकडे पर्याय खुले

नाशिक : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक २५ जागा मिळवून अध्यक्ष पदावर दावा सांगितला असून, जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला राखीव असल्याने सिन्नर तालुक्यातील चार, तर येवला तालुक्यातील तिघा महिला सदस्य या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत.  दरम्यान, जिल्हा परिषदेत भाजपाने शिवसेनेसोबत युतीची तयारी दर्शविली असली तरी शिवसेनेकडून युतीचा निर्णय मुंबईहून होण्याची शक्यता आहे. तूर्तास शिवसेनेने युतीसाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष यांचे पर्याय ठेवले असून, भाजपासोबत युतीचा निर्णय झालाच, तर शिवसेना भाजपाकडे बहुमतापेक्षा जास्त तीन जागा असतील. त्या परिस्थितीत अध्यक्ष शिवसेनेचा तर उपाध्यक्ष भाजपाचा हा सरळ सरळ फॉर्म्युला शिवसेनेकडून ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.  शिवसेनेकडून अध्यक्ष पदासाठी सिन्नर तालुक्यातून चार महिला निवडून आल्या असून, त्यात शीतल सांगळे, वनिता शिंदे, सुनीता सानप व वैशाली खुळे या चार महिलांचा समावेश आहे. त्यात शीतल सांगळे या आमदार राजाभाऊ वाजे यांचे खंदे सर्मथक उदय सांगळे यांच्या पत्नी आहेत, तर वैशाली खुळे या तालुकाप्रमुख दीपक खुळे यांच्या पत्नी असल्याने दोघेही अध्यक्षपदासाठी सिन्नर तालुक्यातून प्रबळ दावेदार आहेत.  येवला तालुक्यातून शिवसेनेकडून राजापूर गटातून सुरेखा दराडे, नगरसूल गटातून सविता पवार व मुखेड गटातून कमल अहेर या निवडून आल्या आहेत. त्यात सुरेखा दराडे या जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या पत्नी असून, सविता पवार या माजी आमदार मारोतराव पवार यांच्या स्नुषा, तर शिवसेनेचे येवल्याचे विधानसभेचे उमेदवार संभाजीराजे पवार यांच्या नातलग आहेत. शिवसेनेकडून आता अध्यक्ष पदाची संधी सिन्नर की येवल्याला मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (प्रतिनिधी)