शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय चर्चासत्रात मास्क न घालणाऱ्या सात जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:12 IST

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागताच प्रशासनदेखील आरोग्य नियमांचे पालन करण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. त्यानुसार शनिवारी (दि.२०) शहरात एका वैद्यकीय चर्चासत्राच्या वेळी मास्क न वापरणाऱ्या सात जणांकडून दंड वसूल करण्यात आला आहे, तर देवळाली कॅम्प येथेही मास्क आणि सुरक्षित अंतराचे पालन न केल्याने पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दिवसभरात १२० जणांवर कारवाई करून २९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमनपाची कठोर मोहीम : दिवसभरात १२० जणांवर कारवाई

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागताच प्रशासनदेखील आरोग्य नियमांचे पालन करण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. त्यानुसार शनिवारी (दि.२०) शहरात एका वैद्यकीय चर्चासत्राच्या वेळी मास्क न वापरणाऱ्या सात जणांकडून दंड वसूल करण्यात आला आहे, तर देवळाली कॅम्प येथेही मास्क आणि सुरक्षित अंतराचे पालन न केल्याने पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दिवसभरात १२० जणांवर कारवाई करून २९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.शहरात ऑक्टोबर महिन्यांनतर कोरोनाबाधितांची संख्या घटली आणि त्यामुळे कोरोना नियंत्रणात येऊ लागल्याचे चित्र होते. मात्र, १० फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने महापालिकेने थेट कारवाई सुरू केली आहे. शनिवारी तर एकाच दिवसात १२० जणांवर मास्क आणि सुरक्षित अंतराचे पालन न केल्याने दंड वसूल करण्यात आला आहे. यात पंचवटी विभागात ५२ जणांकडून १० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर सिडकोत २७ जणांकडून ५ हजार ४००, सातपूर येथे २१ जणांवर कारवाई करण्यात आली असून, नाशिक पूर्व विभागात १३ जणांकडून ७ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नाशिक पश्चिममध्ये मात्र कमी म्हणजेच ७ जणांवर कारवाई करून १४० रुपयांचा दंड जमा करण्यात आला आहे. हा सर्व दंड एका वैद्यकीय सेमिनारमध्ये करण्यात आला. शहरात कालिका मंदिराजवळ एका हॉटेलमध्ये वैद्यकीय विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी मनपाच्या पश्चिम विभागाच्या पथकाने तेथे जाऊन तपासणी केली असता सात जणांनी मास्क न घातल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.वाढदिवस, साखरपुडा कार्यक्रम रडारवरनाशिक शहरात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी आयुक्त कैलास जाधव यांनी विभागीय अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार दिले असून, त्यानुसार लग्नसोहळेच नव्हे, तर साखरपुडा, वाढदिवस, सेमिनार, मेळावे, तसेच अन्य सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रडारवर असणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य