शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक अधिभारातून पालिकेला सात कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 00:18 IST

डिसेंबरमध्ये लॉटरी : एलबीटी ७११ कोटींवर

नाशिक : दरवेळी नवीन वर्षात जानेवारीमध्ये बाजारमूल्यात (रेडीरेकनर) वाढ होत असल्याने डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्रांक नोंदणीचे व्यवहार घडत असतात. मावळत्या वर्षात डिसेंबरमध्ये एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारातून महापालिकेला तब्बल सात कोटी रुपये प्राप्त झाले असून, तुलनेत सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये जादा मिळाले आहेत. दरम्यान, २ जानेवारी २०१६ अखेर महापालिकेने ७११ कोटी रुपयांची एलबीटी वसुली केली आहे. यंदा २०१६ मध्ये रेडीरेकनरची दरनिश्चिती मार्चनंतर करण्याची भूमिका राज्य सरकारने जाहीर केली असली तरी रेडीरेकनर दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याच्या शक्यतेने मावळत्या वर्षात डिसेंबर महिन्यात मुद्रांक नोंदणीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेला एलबीटी अनुदानाबरोबरच राज्य शासनाकडून एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारही दरमहा अदा करण्यात येत आहे. महापालिकेला एप्रिल २०१५ मध्ये ५ कोटी ७ लाख, मे महिन्यात ४ कोटी ६४ लाख, जूनमध्ये ४ कोटी २२ लाख, जुलैमध्ये ४ कोटी ६१ लाख, आॅगस्टमध्ये ५ कोटी ११ लाख, सप्टेंबरमध्ये ५ कोटी ५० लाख, आॅक्टोबरमध्ये ५ कोटी १६ लाख, नोव्हेंबरमध्ये ४ कोटी ३४ लाख रुपये एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारापोटी रक्कम शासनाकडून मिळाली होती. मात्र, डिसेंबर महिन्यात सदर रक्कम ७ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळे महापालिकेला सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये जादा मिळाले आहेत.