शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभर सेवा बंद, तरीही ‘सक्तवसुली’!

By admin | Updated: January 5, 2016 00:37 IST

रिलायन्स इंटरनेट सेवेचा खेळखंडोबा सुरुच; तक्रार करूनही बिलांत सूट नाहीच

 नाशिक : रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या इंटरनेटसेवेचा खेळखंडोबा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरूच असून त्यात दिवसेंदिवस नव्याने भर पडत आहे. येथील खुटवडनगर, वावरेनगर, कामटवाडा भागात महिनाभरापेक्षाही अधिक काळ रिलायन्सची इंटरनेट सेवा बंद असतानाही त्या कालावधीतील हजारो रुपयांची बिले कंपनीतर्फे नुकतीच पाठविण्यात आली आहेत. दोन महिन्यापूर्वीदेखील इंटरनेट सेवा महिनाभरापेक्षाही अधिक काळ बंद होती. त्यावेळीही ग्राहकांना पूर्ण रकमेची बिले पाठविण्यात आली होती. कंपनीकडूनच सेवा बंद असतानाही बिलवसुली करणे ही फसवणूक असल्याची भावना ग्राहकांनी व्यक्त केली असून अनेकांनी त्यांसदर्भात कंपनीकडे तशा तक्रारीही केल्या आहेत, मात्र अद्याप त्याची दखल घेतली गेलेली नाही.तक्रार करणाऱ्या ग्राहकांना, सेवा बंद असलेल्या कालावधीतील बिल माफ करण्याचे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले असले तरी यासंदर्भातली मेख अशी की, ज्या ग्राहकांनी रिलायन्सच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे (आॅनलाइन कस्टमर केअर सेंटर) आपली तक्रार अथवा विनंती नोंदवली असेल त्यांनाच फक्त बिलात सूट मिळेल, असे सांगण्यात आले. तसेच इंटरनेट सेवा बंद असल्याची तक्रार ग्राहकांनी ज्या दिवशी केली, त्या दिवसापासूनच ही सूट मिळू शकेल असे कंपनीचे म्हणणे आहे. इंटरनेटची सेवा पूर्ववत सुरू होईल या आशेने ज्यांनी तक्रारच केली नाही, अशा ‘सोशिक’ ग्राहकांना मात्र सेवा बंद असूनही पूर्ण बिल भरावे लागेल किंवा तक्रार केल्याच्या तारखेपासून म्हणजेच मर्यादित सूट मिळेल! रिलायन्स इंटरनेटच्या खंडित सेवेमुळे परिसरातील ग्राहक वैतागले असून ज्यांनी वेगवान इंटरनेटसेवेच्या आश्वासनावर भविष्याचे आडाखे बांधले त्यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. भलेमोठे आर्थिक नुकसान सोसून काहींना आपला ‘सायबर कॅफे’चा उद्योग गुंडाळावा लागला, तर रिलायन्स सेवेची ही गुणवत्ता पाहून काहींनी तो विचार ‘वेळीच’ सोडून दिला. सेवेत सुधारणा होत नसल्याने अनेकांनी आपली सेवाही बंद केली आहे. (प्रतिनिधी)