शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

जुना तोफगोळा सापडल्याने खळबळ उडाली़

By admin | Updated: December 29, 2014 01:59 IST

जुना तोफगोळा सापडल्याने खळबळ उडाली़

नाशिकरोड : देवळाली गाव वालदेवी नदीपुलाखाली नवीन पुलाच्या बांधकामाचे काम सुरू असताना रविवारी दुपारी जुना तोफगोळा सापडल्याने खळबळ उडाली़ या घटनेची माहिती लष्कराला देण्यात आली असून, सोमवारी लष्कराचे पथक पाहणीसाठी येणार आहे़
नाशिकरोडकडून देवळाली कॅम्पकडे जाताना डाव्या बाजूला वालदेवी नदीवर नवीन पुलाचे काम सुरू आहे़ रविवारी दुपारी जेसीबीच्या साहाय्याने उभारलेल्या पिलरची स्वच्छता व गाळ बाजूला करण्याचे काम सुरू होते़ दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास नवीन पुलाच्या पिलरजवळ उत्खननाचे काम सुरू असताना त्याठिकाणी जमिनीत दडलेला ब्रिटिशकालीन तोफगोळा आढळून आला़ त्यामुळे कामगारांची धावपळ उडाली व सर्वजन काम सोडून पळून गेले़ पंधरा दिवसांपूर्वीच रोटेशन पद्धतीने धरणातून सोडलेल्या पाण्याची पातळी दोन दिवसांपासून खालावलेली असल्याने हे काम हाती घेण्यात आले होते़ या घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसांना समजताच दुय्यम पोलीस निरीक्षक युवराज गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली व बॉम्बशोधनाशक पथकाला पाचारण केले़ हा ब्रिटिशकालीन तोफगोळा पुलाखालून उचलून सुरक्षित ठेवण्यात आला असून, याबाबतची माहिती लष्कराला देण्यात आली़ मात्र रविवारची सुटी व सायंकाळ झाल्याने लष्करी विभागाचे पथक सोमवारी पाहणीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली़ या घटनेची माहिती नागरिकांना समजताच त्यांनी तोफगोळा पाहण्यासाठी गर्दी केली होती़ या तोफगोळ्याजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तो जिवंत आहे की वापरलेला हे लष्करी पथकाच्या पाहणीनंतरच स्पष्ट होणार आहे़ (वार्ताहर)