वागदर्डी धरण परिसरात सीडबॉलचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:41 IST2020-07-10T17:40:58+5:302020-07-10T17:41:20+5:30

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी साठवणूक बंधारा परिसरात मनमाड जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव कृती समितीने  वृक्षारोपण आणि सिडबॉल रोपणाचा उपक्रम वनाधिकारी राम महाले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला.

Seedball planting in Vagdardi dam area | वागदर्डी धरण परिसरात सीडबॉलचे रोपण

वागदर्डी धरण परिसरात सीडबॉलचे रोपण

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी साठवणूक बंधारा परिसरात मनमाड जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव कृती समितीने  वृक्षारोपण आणि सिडबॉल रोपणाचा उपक्रम वनाधिकारी राम महाले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला.
यावेळी नगरपरिषदेचे प्रशासनाधिकारी राजेन्द्र पाटील , अजहर शेख, किशोर गोसावी, नाना जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. लॉकडाऊन नियमांचे पालन करीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुंडलिक कचरे,युनूस पठाण, रामदास पगारे, सुरेश वाघ, मनोज गांगुर्डे, कांतीलाल येणारे,शमशाद सय्यद,रश्मी मोरे, सुशांत केदारे,मधुकर मोरे, रेखा येणारे ,अशोक परदेशी आदी उपस्थित होते.

Web Title: Seedball planting in Vagdardi dam area

टॅग्स :Nashikनाशिक