शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनीच उघडले शाळेचे कुलूप

By admin | Updated: July 5, 2016 00:37 IST

पिळकोस : समस्यांची दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये संताप

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील जिल्हा परिषद शाळेला ठोकण्यात आलेले कुलूप कोणीही दखल न घेतल्याने पालकांनीच उघडले. एक वर्षापासून भाषा विषयासाठी पदवीधर शिक्षक नसल्यामुळे या शाळेला पालकांकडून सोमवार, दि. २७ जून रोजी कुलूप ठोकण्यात आले होते. शाळा बंद करून आठवडा उलटला तरीही पदवीधर शिक्षकाची नेमणूक केली गेली नाही. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता व प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनीही याची दखल न घेतल्यामुळे अनेक दिवस शाळा बंद ठेवूनही उपयोग होत नसल्याचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून शेवटी पालकांकडून नाइलाजास्तव शाळेचे कुलूप उघडण्यात आले व शाळा पूर्ववत सुरू करण्यात आली.पदवीधर शिक्षकाची या शाळेवर नेमणूक होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा परिषद वा पंचायत समितीच्या एकाही अधिकाऱ्याने शाळा पूर्ववत सुरू होण्यासाठी पालकांशी व गावकऱ्यांशी चर्चा केली नाही. याउलट पालकांना सांगितले गेले की, पदवीधर शिक्षकाची नेमणूक जिल्हा परिषदेकडून केली जाईल, यात आम्ही काहीही करू शकत नसून शाळा बंद केल्याने तुमच्याच पाल्याचे नुकसान होईल.शाळा बंद करून अनेक दिवस होऊनही याची दखल जिल्हा परिषद नाशिक, गटशिक्षण अधिकारी कळवण, गटविस्तार अधिकारी कळवण व प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, केंद्रप्रमुख यांसह लोकप्रतिनिधीनी न घेता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी पालकांनी शाळेचे कुलूप उघडून शाळा पूर्ववत सुरू केली.यामुळे पालकांनी आपल्या पाल्याची शिक्षणाची सोय दुसरीकडे लावण्याचा आता निर्णय घेतला असून, दाखले काढून खासगी शाळेत पालक आपल्या पाल्यांना टाकणार असल्याचे यावेळी पालकांनी सांगितले.मुख्याध्यापक यांनी मागणी केली होती का हे पाहण्यासाठी शाळेचे शालेय शिक्षण समितीचे प्रोसेडिंग पाहिले असता ते प्रोसेडिंग अपूर्ण होते हे या दरम्यान निदर्शनास आले. तालुक्याच्या शिक्षण विभागालाही याची माहिती नसल्याचे तालुका पातळीवरील अधिकारी पालकांना यावेळी सांगू लागले. मग पालक ग्रामस्थ वर्षभर याबातीत निवेदन देत होते ते गेले कुठे? पालकांनी दिलेल्या निवेदनाचा तालुकास्तरावरून पाठपुरावा झाला नसल्याचा आरोप समाजसेवक श्रीधर वाघ यांनी शिक्षण विभागावर केला. जिल्हा परिषद शाळेतून विद्यार्थ्यांचे दाखले काढण्याशिवाय पर्याय आता पालकांपुढे नसल्यामुळे शाळा बंद करूनही शिक्षण विभाग, लोकप्रतिनिधिनी याची दखल न घेतल्यामुळे पालकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. (वार्ताहर)