शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा आगाराची मुक्कामी एसटी बस सेवा दोन महिन्यांपासून बंद

By admin | Updated: September 12, 2016 00:25 IST

सटाणा आगाराची मुक्कामी एसटी बस सेवा दोन महिन्यांपासून बंद

 पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण-विसापूर मार्गावरील वळण रस्त्यावर ठिकठिकाणी चार ते पाच ठिकाणी भगदाड पडल्याने भादवणला येणारी सटाणा आगाराची मुक्कामी बस सेवा दोन महिन्यांपासून बंद झाली आहे. यामुळे भादवण येथील शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व तालुक्याच्या ठिकाणी जाणारे ग्रामस्थ, शेतकरी, गावात येणारे नातलग यांची मोठी गैरसोय झाली असून, संबंधित विभागाकडून रस्ता अद्यापही सुरळीत केला जात नसल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे .यंदाच्या जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहून निघाल्याने व परिसरात दोनदा झालेल्या मुसळधार पावसाने भादवण-विसापूर रस्त्याला वळणाच्या ठिकाणी चार ते पाच जागेवर अत्यंत खोल भगदाड पडल्याने या रस्त्यावरून चारचाकी वाहने जाऊ शकत नसल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस सुरळीत राहिला नसून भगदाड असलेल्या वळणावर ट्रॅक्टर, एस.टी. टेम्पो, ट्रक अशा लांब वाहनांचे मागील चाक भगदाडाच्या ठिकाणी जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गावात मुक्कामी येणारी बस दोन महिन्यापासून बंद झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला जाण्यासाठी पाच कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. रस्त्याला पडलेले भगदाड संबंधित विभागाकडून बुजविण्यात न आल्यामुळे भादवण येथील गावकऱ्यांची गैरसोय होऊन त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.भादवण-विसापूर रस्त्याला शेती असलेल्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समितीत घेऊन जाण्यासाठी हा रस्ता आता वापरता येत नसल्याने फेरा मारून जावे लागत आहे. संबंधित विभागाने याबाबतीत लक्ष न घातल्याने सदर रस्ता अपघातग्रस्त झाला आहे .संबंधित विभागाने भगदाड बुजवून रस्ता सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंकज जाधव, नीलेश जाधव, मोहन जाधव, गौतम जाधव, प्रवीण जाधव, काकाजी जाधव, राहुल जाधव, अनिल जाधव, प्रमोद जाधव, सुधाकर जाधव यांनी दिला आहे. (वार्ताहर)