शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत सराईत गुन्हेगाराची हत्या

By admin | Updated: April 28, 2017 00:34 IST

दिंडोरीरोडवरील अवधूतवाडी येथील सराईत गुन्हेगार अजित शशिकांत खिच्ची (२८) याची गजानन चौकात हत्त्या

पंचवटी : दिंडोरीरोडवरील अवधूतवाडी येथील सराईत गुन्हेगार अजित शशिकांत खिच्ची (२८) याची गजानन चौकात हत्त्या करण्यात आल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अज्ञात टोळक्याने अजित खिच्ची याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अजित यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयाबाहेर परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी रुग्णालय परिसरात तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. रात्री उशिरा ११.३० वाजेच्या सुमारास अजित हा येथील पानटपरीवर आला असता पाच ते सहा हल्लेखोरांनी त्याच्यावर शस्त्राने वार केले. सदर हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अजित याला काही दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी करून पोलिसांनी २९ भ्रमणध्वनी जप्त केले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अजितची हत्त्या आपसातील वैमनस्यामुळे झाली असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला असून, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.काही दिवसांपूर्वीच मार्केट यार्ड परिसरात एका तरुणाचा भोसकून खून करण्यात आला होता. या घटनेला महिना उलटत नाही तोच पुन्हा हत्त्येची घटना घडल्याने पंचवटीत परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)